Posts

ऊस गळीत हंगाम सन२०२४/२५ साठी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

Image
                             नवारस्ता/प्रतिनिधी  गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने  सन २०२४/२५ या वर्षासाठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ  गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  करण्यात आला.   राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे चेअरमन मा.श्री. यशराज देसाई यांच्या प्रयत्नातून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर  कारखान्याने आपली प्रगती कायम राखण्यात यश मिळवले आहे.       आजपर्यंत कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक करार हे साधारण मे महिन्यात केले जातात मात्र देसाई कारखान्याने या कराराचा शुभारंभ गुढी पाडव्याच्या  मुहूर्तावर करून एक पाऊल पुढे टाकले आहे.     यावेळी पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक  शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा  जास्तीत जास्त वापर करून ऊस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे तसेच  शेतक-यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास ग

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दौलतनगर येथे दि.10 मार्च रोजी 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम.

Image
  दौलतनगर दि . 08 :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष , राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन   मा.श्री.यशराज देसाई( दादा ), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई( दादा ) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि .10 मार्च , 2024 रोजी सकाळी 10.00 दौलतनगर ( मरळी ), ता . पाटण येथील “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे .                 प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की , महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठ

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 151 गावातील 297 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

Image
  दौलतनगर दि . 05 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत   विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत / पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना . शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 151 गावातील तब्बल 297 कि . मी . लांबीच्या शेत / पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना . संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती . त्यानुसार   पाटण मतदारसंघातील 151 गावातील सुमारे 297 कि . मी . लांबीच्या शेत / पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत / पाणंद र

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे आज राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा.

Image
    दौलतनगर दि . 05 :- राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक 04/03/2024 ते 10/03/2024 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन श्री.यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सर्व कर्मचारी आधिकारी या सर्वानी एकत्रित येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर मरळी येथे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली.त्यांना ही शपथ कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी दिली.              यामध्ये सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत :ला पूर्ण वाहून घेऊन आमच्या स्वत :च्या आमच्या कुटुंबाच्या, आपल्या कारखान्याच्या, समाजाच्या व आपल्या देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे व सूचनांचे पालन करू व आपल्या कारखान्यातील अपघात टाळणेसाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोतम प्रयत्न करू अशी शपथ घेतली.             याप्रसंगी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, संचालक अशोकराव पाटील

पाटण तालुक्यातील दिव्यांगांना चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप व किशोरवयीन मुली व महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे ही उद्घाटन

Image
                    पाटण (०८ जानेवारी २०२४) :   पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली केंद्र   व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, तसेच तालुक्यातील किशोरवयीन मुली आणि महिला भगिनींसाठी आरोग्य, तंत्रज्ञान आणि कायदेविषयक बाबींचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, यादृष्टीने कायम सहकार्य राहील, असे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनी केले. पाटण पंचायत समितीच्या वतीने आयोजित आणि दिव्यांगांना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप आणि महिला प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मा. यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.     लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण यांच्यावतीने सुस्वाद हॉल   म्हावशी पेठ पाटण येथे दिव्यांगांना साहाय्यक साहित्य वाटप तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदेसाहेबांकडे धनादेश सुपूर्द केला.

Image
  मुंबई (बुधवार, दि. ०६ सप्टेंबर २०२३) : महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचे बंधू आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत संस्थेतील पदाधिकारी-कर्मचाऱ्यांनी उभी केली. या रकमेचा धनादेश बुधवारी मा. ना. शंभूराज देसाई साहेब व मा. रविराजदादा देसाई यांच्या हस्ते मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांकडे सुपूर्द करण्यात आला.   मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई यांचा अलीकडेच वाढदिवस संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्सवी प्रथांना दूर सारून यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत उभी करण्याचे ठरवले. त्यातून रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथील, तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून संस्थेने ५१ हजार रुपये निधी उभा केला. बुधवारी मा. ना. शंभूराज देसाई साहेब व मा. रविराजदादा देसाई यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस स

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

Image
  दौलतनगर दि .17:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे . सध्या आपल्या कारखान्याचे दुसऱ्या टप्पयातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करत आहोत. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता . यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे . नियोजनबध्द काम करुन सन 2023-24 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा वे असे आवाहन चेअरमन यशराज देसाई ( दादा ) यांनी केले .                 दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2023-24 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन   कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले .यावेळी अशोकराव पाटील,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सुनील पानस्कर,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी