Posts

Showing posts from January, 2024

पाटण तालुक्यातील दिव्यांगांना चेअरमन यशराजदादा देसाई यांच्या हस्ते दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप व किशोरवयीन मुली व महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे ही उद्घाटन

Image
                    पाटण (०८ जानेवारी २०२४) :   पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली केंद्र   व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, तसेच तालुक्यातील किशोरवयीन मुली आणि महिला भगिनींसाठी आरोग्य, तंत्रज्ञान आणि कायदेविषयक बाबींचे प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, यादृष्टीने कायम सहकार्य राहील, असे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनी केले. पाटण पंचायत समितीच्या वतीने आयोजित आणि दिव्यांगांना प्रातिनिधक स्वरुपात दिव्यांग साहाय्यक साहित्याचे वाटप आणि महिला प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मा. यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.     लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण यांच्यावतीने सुस्वाद हॉल   म्हावशी पेठ पाटण येथे दिव्यांगांना साहाय्यक साहित्य वाटप तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदा