Posts

Showing posts from August, 2022

दि.12 ऑगस्ट रोजीचे वाढदिनी मा.रविराज देसाई (दादा) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत दौलतनगर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्विकारणार.

Image
    दौलतनगर दि .11:- दि.12 ऑगस्ट 2022 रोजीचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) हे सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत दौलतनगर,ता.पाटण येथील शिवविजय सभागृहामध्ये उपस्थित राहून पाटण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने शुभेच्छा स्विकारणार असल्याची माहिती वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.              प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दि. 12 ऑगस्ट,2022 रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे सकाळी 10 वाजता दौलतनगर,ता.पाटण येथे आगमन होणार आहे.प्रथम ते दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. त्यानंतर श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत. स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. स्व.शिवाजीराव देसाईसाहेब यांचे समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन

राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी तातडीने जमिन हस्तांतरण करण्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे निर्देश. आमदार शंभूराज देसाई यांची माहिती.

Image
  दौलतनगर दि .05:- : पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणा-या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाची आवश्यकता   लक्षात घेऊन कोयनानगर,ता.पाटण येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी गतवर्षापासून राज्यासनाकडे माझा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावासंदर्भात उच्चस्तीय बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केलेली होती. यासंदर्भात आज मंत्रालय मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.                 पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जमिन हस्ता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशानुसार पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक खाजगी जमिन खरेदीसाठी ४ कोटींचा निधीची तरतूद. आमदार शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश,पुनर्वसनाचा प्रश्न लागणार मार्गी.

Image
  दौलतनगर दि .05:- गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांत भूस्खलन होऊन जिवित व वित्त हानी झाली होती. भूस्खलनामुळे धोकादायक स्थितीतमध्ये असलेल्या आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी,जितकरवाडी (जिंती) या सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता गतवर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या गावांचे कायमस्वरुपी   पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन या बैठकीत   पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे,ढोकावळे,मिरगाव,हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमिन खरेदी करण्याकरीता आवश्यक असलेल्या   ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद   करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.                सदर बैठकीला अपर