Posts

Showing posts from September, 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची दौलतनगर येथे शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.

Image
     दौलतनगर दि .14 : दौलतनगर , ता . पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री   ना . शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि .17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वा संपन्न होणार आहे . “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर , ता . पाटण या ठिकाणी   मंत्री   ना . शंभूराज देसाई , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई ( दादा ) व सर्व संचालक मंडळ हे 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहणार आहेत . तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दी पत्रकांत दिली आहे .