Posts

Showing posts from July, 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

Image
  दौलतनगर दि .29 ( जनसंपर्क कक्ष , राज्यमंत्री कार्यालय ) :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये चांगली वाटचाल करत आहे . सध्या आपल्या कारखान्याचा पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आपला मनोदय आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे . यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा या गळीत हंगामामध्ये ऊसाचे प्रमाण जास्त आहे . नियोजनबध्द काम करुन सन 2022-23 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा , आवाहन चेअरमन यशराज देसाई यांनी केले .      दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन   कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले .यावेळी व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटी

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन पदी यशराज देसाई यांची बिनविरोध निवड. व्हाईस चेअरमन पदी पांडूरंग आण्णासो नलवडे यांची वर्णी.

Image
दौलतनगर दि.23:- पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याची सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाची निवडणुक  बिनविरोध पार पडली होती. आज दि. 23 जुलै रोजी झालेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.यामध्ये आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र युवा नेते यशराज देसाई यांची चेअरमन पदी तर पांडूरंग आण्णासो नलवडे यांची व्हाईस चेअरमनपदी  बिनविरोध निवड झाल्याचे शिक्कामोर्तब निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी केले.         दौलतनगर,ता. पाटण तालुक्यातील ऊस सभासद शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल ऐन पावसात वाजला होता. या निवडणूकीसाठी ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांनी या निवडणूकीची धुरा सांभाळली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी अर्ज दाखल राहिल्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.त्यानुसार आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडीचा कार्यक्रम होता.या पदाच्या नि

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेला पाटण विधानसभा मतदारसंघातील 2642 लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे जाहिर समर्थन.

Image
  दौलतनगर दि . 16 :-  महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गत महिन्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. हिंदू हृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेसह राज्यातील तब्बल 50 आमदारांनी उठाव करत राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती साकाराली.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व माजी गृहराज्यमंत्री आणि पाटण तालुकयाचे आमदार शंभूराज देसाई यांचेसह 50आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेला पाटण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचे नेतृत्वाखाली असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या 2642 लोकप्रतिनिधीं व पदाधिकारी यांनी जाहीर समर्थन करुन पाठिंबा व्यक्त  केला आहे.           सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेल्यानंतर या विधानसभा निवडणूकीचे निकालामध्ये शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत दिले होते.परंतु अचानक काही घटना घडल्याने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना होऊन राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच समविचारी पक्षांची मह