Posts

दौलतनगर-मरळी येथे आरटीओ कॅम्प; 80 जणांची ड्रायव्हिंग टेस्ट, 68 लर्निंग लायसन्सचे वितरण

Image
  दाैलतनगर, दि. 8 : प्रतिनिधी पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग, कराड यांच्या वतीने दौलतनगर-मरळी (ता. पाटण) येथे मंगळवारी आरटीओ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये 80 नागरिकांच्या ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्या, तर 68 लर्निंग लायसन्सचे वितरण करण्यात आले. त्यामुळे आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना कराडपर्यंत जाण्याची होणारी गैरसोय काही प्रमाणात कमी झाली. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार हा कॅम्प आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या उपस्थितीत कॅम्पच्या कामकाजाला सुरुवात झाली. आरटीओ विभागाच्या विविध सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. विशेषतः शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वाहनचालक परवान्याशी संबंधित प्रक्रियेसाठी नागर...

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.

Image
            लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखन्यामार्फत राबवत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्हीएसआय पुणे येथे कारखान्याचे 22 प्रगतशील शेतकरी   यांना ऊस लागणी पासून काढणी पर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती   होण्यासाठी दि.30जून ते 03 जुलै पर्यंत चार दिवसीय प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक पद्धतीने ऊस उत्पादन घेवून एकरी टनेज वाढविले पाहिजे या संकल्पनेच्या विचारातून महाराष्ट्र राज्याचे   पर्यटन मंत्री   तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा) यांच्या मार्गदर्शनातून सदर प्रशिक्षण कार्यक्रमात कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी हे सहभागी झाले आहेत.              सदर प्रशिक्षणास प्रेरित होऊन आणि ऊस उत्पादक शेतक-यांना प्रेरणा देण्यासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. पांडूरं...

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

Image
  सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस प्रमुख तुषार दोषी यांची सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली झाली मात्र बदली झालेच्या दिवशीच संबंधित पोलिस प्रमुखांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्या.या नियमबाह्य बदल्याबाबत सातारा जिल्हा शिवसेना राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन देऊन राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल दाखल केली  आहे.  निवेदनात पुढे म्हटले आहे की,  सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपासून सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून यासंदर्भात राज्याच्या विधिमंडळात ही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत.एवढेच नव्हे तर या घटनेचे संपूर्ण  राज्यसहित देशात चर्चा झाली.त्यामुळे राज्य सरकारने तुषार दोषी यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर ही पाठविले होते.   अशा या वादग्रस्त पोलीस अधीक्षकांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन  संबंधित अधीक्षकांची सातारा येथून सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली केली.मात्र या अधीक्षकांनी स्वतःची बदली झाली असताना आपल्या अधिकाराचा...

यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची आदर्श कामगिरी शेतकऱ्यांना ३ हजार एवढा उच्च दर देत पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी लोकनेत्यांचा वारसा जपणारे कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून यशराज देसाईंचे सहकार व कृषी क्षेत्रातून कौतुक

Image
  सातारा (१५ एप्रिल २०२६) : पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगात स्पर्धा तीव्र असताना, मर्यादित उत्पादन क्षमता असूनही शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देत पाटण तालुक्यातील मरळी-दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सरस कामगिरी केली असून शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी ऊस दर वर्ग करणारा सातारा जिल्ह्यातील हा दुसरा कारखाना ठरला आहे.   लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन असतानाही, पहिल्याच उचलीत ३ हजार रुपयांची रक्कम देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एफआरपी देण्यासाठी कोणतेही कर्ज न उभारता १०० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे केवळ १,९५,००० मेट्रिक टन गाळप झाले होते. तरीही पूर्ण एफआरपी वेळेत जमा करण्यात आली. डोंगराळ, दुर्गम भागातील कमी गाळप क्षमतेचा कारखाना असूनही इतर मोठ्या कारखान्यांप्रमाणे स्पर्धात्मक दर देण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना यशस्वी ठरला आहे....

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 43 व्या पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.

Image
  दौलतनगर दि .13:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर , ता . पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन सोम वार दि . २० एप्रिल ते गुरुवार दि . २३ एप्रिल , २०२ 6 पर्यंत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर ता . पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे . लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते . सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि . २३ एप्रिल , २०२ 6 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि . २० ते २३ एप्रिल , २०२ 6 पर्यंत तीन दिवसीय श्र...

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारीसाखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदारांना करार पत्राचे वितरण.

Image
  दौलतनगर दि.24: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याचे सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडित प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने कमी कालावधीत कारखाना कार्यक्षेत्रामधील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केले.दरम्यान सन 2026-27 चा येणारा गळीत हंगाम सुरु करण्याच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात येऊन कारखान्याचे ऊस वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण   कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील,शिवाजीराव देसाई ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,व्हा.चेअरमन यादवराव तिकुडवे,संचालक शंकर पाटील, सुभाष गव्हाणे, संजय पवार,मयुर जाधव,कार्यकारी संचालक सुहास देसाई,श...

जनतेने नाकारलेल्यांनी आमच्या नेत्यांना सल्ला देवू नये - उपसभापती विजय पवार.

Image
  दौलतनगर दि .23:- आमचे नेते पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. जनता दरबारच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रशासनातील अधिकारी यांना सुचना करत असल्याने जनेतेचे प्रश्न मार्गी लागतात.त्यामुळे ते कधीही प्रशासनावर दबाव टाकण्याचा विषय येत नाही. हे समजण्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असावी लागते,सत्यजित पाटणकर आपण केवळ निवडणूकी पुरते जनतेच्या दारात गेल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या निकालाने नियतीचा फेरा कुणाचा उलटा फिरला आहे हे मतदारसंघातील जनतेने दाखवला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा आणि नैतिक अधिकार याविषयी फुकाच्या गप्पा आपण तरी मारु नये.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा आमचे नेते सक्षमपणे चालवत असून आम्हाला त्यांचा निश्चित अभिमान आहे.त्यामुळे आमचे नेते पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा राजीनामा मागण्या अगोदर जनतेने नाकारलेल्या   सत्यजित पाटणकर यांनी आमच्या नेत्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करु नये.असा टोला लोकनेते बाळासाहेब देसाई भवन, पंचायत समिती पाटणचे ...