Posts

Showing posts from March, 2024

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दौलतनगर येथे दि.10 मार्च रोजी 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम.

Image
  दौलतनगर दि . 08 :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष , राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन   मा.श्री.यशराज देसाई( दादा ), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई( दादा ) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि .10 मार्च , 2024 रोजी सकाळी 10.00 दौलतनगर ( मरळी ), ता . पाटण येथील “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे .                 प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की , महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठ

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 151 गावातील 297 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

Image
  दौलतनगर दि . 05 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत   विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत / पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना . शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 151 गावातील तब्बल 297 कि . मी . लांबीच्या शेत / पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना . संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती . त्यानुसार   पाटण मतदारसंघातील 151 गावातील सुमारे 297 कि . मी . लांबीच्या शेत / पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत / पाणंद र

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे आज राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा.

Image
    दौलतनगर दि . 05 :- राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक 04/03/2024 ते 10/03/2024 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन श्री.यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सर्व कर्मचारी आधिकारी या सर्वानी एकत्रित येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर मरळी येथे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली.त्यांना ही शपथ कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी दिली.              यामध्ये सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत :ला पूर्ण वाहून घेऊन आमच्या स्वत :च्या आमच्या कुटुंबाच्या, आपल्या कारखान्याच्या, समाजाच्या व आपल्या देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे व सूचनांचे पालन करू व आपल्या कारखान्यातील अपघात टाळणेसाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोतम प्रयत्न करू अशी शपथ घेतली.             याप्रसंगी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, संचालक अशोकराव पाटील