Posts

Showing posts from August, 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

Image
  दौलतनगर दि .17:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे . सध्या आपल्या कारखान्याचे दुसऱ्या टप्पयातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करत आहोत. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता . यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे . नियोजनबध्द काम करुन सन 2023-24 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा वे असे आवाहन चेअरमन यशराज देसाई ( दादा ) यांनी केले .                 दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2023-24 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन   कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले .यावेळी अशोकराव पाटील,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सुनील पानस्कर,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी

रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसादिवशी परगावी जाणार.

Image
दौलतनगर दि .10 :-  मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. 12 ऑगस्ट,2023 रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व वाढदिवस नियोजन समिती   यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम, यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील ईशाळवाडी येथे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली व ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील झालेल्या दुर्घटनेमुळे स्थगित करण्यात आले आहेत . दि.12  ऑगस्ट    यादिवशी मा.रविराज देसाई (दादा) हे परगांवी जाणार असून कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात अशी माहिती वाढदिवस  सं योजन समिती व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली  आहे .  पत्रकांत म्हंटले आहे की , मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. 12 ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र