Posts

Showing posts from March, 2023

मा. यशराज देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर साहेब, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

Image
                                मुंबई : महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा . शंभूराज देसाई साहेबांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा . यशराजदादा देसाई यांनी लिहिलेल्या ‘ लिव्हिंग द ग्रेटर लाइफ ’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी , १७ मार्च २०२३ रोजी विधानभवनातील समिती कक्षात संपन्न झाला . यावेळी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष मा . राहुलजी नार्वेकर साहेब , मुख्यमंत्री मा . एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा . देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते , तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ लिव्हिंग द ग्रेटर लाइफ ’ चे प्रकाशन करण्यात आले . आजच्या डिजिटल युगातील मानवी जीवनातील आव्हांनाकडे तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून पाहात सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या या पुस्तकाबद्दल मा . यशराजदादा देसाई यांचे सर्व मान्यवरांनी यावेळी अभिनंदन केले .        स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून