Posts

Showing posts from September, 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

Image
  दौलतनगर दि .18: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या अंतिम एफ.आर.पी.पोटी रु. 151/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.3.38 कोटी संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.         पत्रकात पुढे म्हंटले आहे की , आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413.652 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 11.98 टक्के साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये एफ.आर.पी.पोटी रु.2650/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 59.46 कोटी रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित अंतिम एफ.आर.पी.पोटी रक्कम रु. 151/- प्र.मे.टन प्रमाणे रु.3.38 कोटी आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती 1...