लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

 


दौलतनगर दि.18: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या अंतिम एफ.आर.पी.पोटी रु. 151/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.3.38 कोटी संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413.652 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 11.98 टक्के साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये एफ.आर.पी.पोटी रु.2650/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 59.46 कोटी रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित अंतिम एफ.आर.पी.पोटी रक्कम रु. 151/- प्र.मे.टन प्रमाणे रु.3.38 कोटी आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती 18 सप्टेंबर 2024 रोजी वर्ग केली असून कारखान्याने सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाला एफ.आर.पी.प्रमाणे होणारी 100 टक्के ऊस बीलाची रक्कम ऊस पुरवठादार सभासद व शेतकरी यांचे खाती वर्ग केली आहेत. तरी ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  शाखेशी संपर्क साधावा असे ही म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2024-25 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु केली असून ऊस तोडणी वाहतूकीचे कराराचे काम  पूर्ण झालेले आहे. तसेच कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून  कारखान्यातील आँफ सिजन मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन  सन 2024-25 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी  चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकांत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.