लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.
दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा आमदार शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचा पहिल्या
टप्प्यातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा
आपला मनोदय आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम
यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे.
यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील
जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून गतवर्षीच्या
गळीत हंगामापेक्षा या गळीत हंगामामध्ये ऊसाचे प्रमाण जास्त आहे.
नियोजनबध्द काम करुन सन 2022-23
चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी
करावा, आवाहन चेअरमन यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते
करण्यात आले.यावेळी व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,अशोकराव
पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,सर्जेराव
जाधव,बळीराम साळूंखे,शंकरराव पाटील,भागूजी शेळके,विजय सरगडे,सौ.दिपाली
पाटील,श्रीमती जयश्री कवर,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब
देसाई,संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा
जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे.लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 2,66,488
मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.82
% साखर उताऱ्याने 3,14,850 क्विंटल साखर उत्पादन केले असून, यंदाच्या गळीत
हंगामापूर्वी आपण कारखान्याच्या विस्तारवाढीच्या पहिल्या टप्प्याचे कामास सुरुवात
केली आहे. यंदाच्या गळीत हंगामापूर्वी पहिल्या
टप्प्यातील विस्तारवाढीचे काम पूर्ण
करण्याचा आपला मानस आहे.त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना
कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व
नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्याचबरोबर गतवर्षीच्या सरासरी साखर
उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले. प्रतिवर्षी
कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही
अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे.तालुक्याच्या
कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन
ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊस दर देण्याचा
आपला नेहमीच प्रयत्न राहणार आहे.आज जरी सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक संकटे
असले तरी ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,ऊस तोडणी मजूर,कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी
यांचे सांघिक प्रयत्नातून या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न
राहणार आहे.येणारा गळीत हंगाम आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी
करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी
नियोजनबध्द काम करावे.तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद
तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला
गळीतास देऊन सहकार्य करावे व येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य
करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
Comments
Post a Comment