लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन पदी यशराज देसाई यांची बिनविरोध निवड. व्हाईस चेअरमन पदी पांडूरंग आण्णासो नलवडे यांची वर्णी.

दौलतनगर दि.23:- पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याची सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाची निवडणुक  बिनविरोध पार पडली होती. आज दि. 23 जुलै रोजी झालेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.यामध्ये आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र युवा नेते यशराज देसाई यांची चेअरमन पदी तर पांडूरंग आण्णासो नलवडे यांची व्हाईस चेअरमनपदी  बिनविरोध निवड झाल्याचे शिक्कामोर्तब निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी केले.

        दौलतनगर,ता. पाटण तालुक्यातील ऊस सभासद शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणारे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल ऐन पावसात वाजला होता. या निवडणूकीसाठी ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांनी या निवडणूकीची धुरा सांभाळली स्व.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी अर्ज दाखल राहिल्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.त्यानुसार आज लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडीचा कार्यक्रम होता.या पदाच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री  व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांची  चेअरमन पदी व व्हाईस चेअरमनपदी पांडूरंग नलवडे यांची सर्व संचालकांच्या अनुमतीने बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी अशोकराव पाटील, डॉ.दिलीपराव चव्हाण  सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील, शशिकांत निकम,सर्जेराव लक्ष्मण जाधव, प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,बळीराम साळूंखे, सौ. दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,विजय  सरगडे , शंकरराव पाटील,भागुजी शेळके हे संचालक,पदाधिकारी,कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते.यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांची सर्वांचे स्वागत केले.


चौकट:- आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सर्वांगीण विकास साधणार-

                                    चेअरमन यशराज देसाई

      लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन म्हणून जी जबाबदारी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगीनी  व नवनिर्वचीत संचालक यांचेमुळे मला मिळाली आहे.ती जबाबदारी आपल्या सर्वांचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब, स्व.शिवाजीराव देसाईसाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारावर व आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संचालक मंडळाचे सहकार्याने प्रयत्नशील राहणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांना चांगला दर देण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करत, सध्या कारखान्याचे दोन टप्प्यामध्ये सुरु असलेल्या विस्तारीकरणाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.त्याचबरोबर कारखान्याचे कर्मचारी यांना यापुढील काळात चांगले दिवस येण्याकरीता धोरणात्मक निर्णय घेणार असून यांचे सातत्याने प्रयत्‍नशिल राहणार आहे.याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद,शेतकरी व अधिकारी कर्मचारी यांनी आपले चांगले सहकार्य ठेवावे असे आवाहनही त्यांनी  शेवटी केले.

चौकट :-मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडून चेअरमन यशराज देसाई यांचे अभिनंदन
 लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आमदार शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांची निवड झाल्याचे समजतात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी यशराज देसाई यांना दूरध्वनी वरुन पुढील भावी वाटचालीस शुभाशीर्वाद देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.