पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 151 गावातील 297 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

 



दौलतनगर दि.05 :- पाटण या डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत  विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने पाटण मतदारसंघातील शेत/पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 151 गावातील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार  पाटण मतदारसंघातील 151 गावातील सुमारे 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयामध्ये समावेश करत या शेत/पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग(रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून राज्यातील शेतकरी हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाचेवतीने घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य व शेत मालाची वाहतूक करण्यासाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत पाणंद रस्त्यांची कामे झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर वाहन जाऊन शेती विषयक कामे जलदगतीने पुर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची शेत/पाणंद रस्त्यांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या रोजगार हमी विभागाकडे शेत/पाणंद रस्ते मंजूर होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मातोश्री  ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 135 गावांतील 209 कि.मी. लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 151 गावांतील तब्बल 297 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.मंजूरी देण्यात आलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये तारळे घोट जूना रस्ता भाग 4 किमी, फडतरवाडी बोर्गेवाडी रस्ता भाग 3 किमी, जंगलवाडी स्मशानभूमी रस्ता  2 किमी, तारळे नवलाई माळ कुशी खबालवाडी रस्ता 1 किमी, वेखंडवाडी चोरजवाडी रस्ता 3 किमी, तारळे चिंचेवाडी रस्ता 5 किमी, केळेवाडी ते घाटेवाडी रस्ता 3 किमी, माळवाडी ते मांडवेकडे जाणारा रस्ता 2 किमी, माळवाडी ते भैरीचामाळ रस्ता 2 किमी, बागलेवाडी डी 15 रस्ता 2 किमी, तारळे किडकेधरण पांढरवाडी रस्ता 3 किमी, खळे ते मालदन रस्ता वड ते चिंचबिगा ते पानवळवाडी रस्ता 2 किमी, कुंभारगाव ते मानेगाव रस्ता ते लक्ष्मी देवी हायस्कूल  ते जैन दफन भूमी ते मोरवसती माळ 2.500 किमी, अलिकडील टेकाची चाळकेवाडी ते पलिकडील चाळकेवाडी 1 किमी, गलमेवाडी येवती रोड ते हारुगडेवस्ती स्मशानभूमी रस्ता 0.200 किमी, कुंभारगाव गलमेवाडी रोड ते मोरेवाडी स्मशानभूमी सारन रस्ता   1.500 किमी, झरे कुंभारगाव ते कुंभारकी सारन रोड रस्ता 0.700 किमी, मोरेवाडी स्मशानभूमी ते बामणकी रस्ता 0.700 किमी, कोकीसरे गावठाण ते नवलाई मंदिर पालखी मार्ग रस्ता 1 किमी, कोकीसरे शिवार रस्ता 0.500 किमी, दिक्षी स्मशानभूमी रस्ता 0.300 किमी, गोकूळ ते आंब्रग रस्ता भाग 2 किमी, वाडीकोतावडे ते टकलेवाडी सातेवाडी रस्ता 1 किमी, नाटोशी डांगळवस्ती ते कामठात जाणारा रस्ता 1 किमी, नाटोशी जळक्याचा माळ ते सातेवाडी रस्ता 1 किमी, नाटोशी लोकरेवस्ती ते इनाम रस्ता 1 किमी, पाचगणी केदारनाथ मंदिर रस्ता 0.300 किमी, पाचगणी मेन रस्ता ते शेळके आवाड केदारी पाटील यांच्या घरावळचा रस्ता 1 किमी, किल्ले मोरगिरी मागासवर्गीय वस्ती स्मशानभूमी रस्ता  1.500 किमी, झाकडे गावठाण ते पवारवस्ती जाणारा रस्ता 0.500 किमी, मोरगिरी जुने गावठाण राजेंद्र साने यांचे घरापासून मोहन कानडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता 0.800 किमी, आंब्रग बौध्दवस्ती मानाई मंदिर ते साकवपूल रस्ता 0.800 किमी, संभापूर गणेश मंदिर ते पाण्याचे टाकी रस्ता 0.400 किमी, पेठशिवापूर धावडे रस्ता मोरेवाडी फाटा ते कवडीचा ओढा विहिरीकडे जाणारा रस्ता 0.400 किमी, मोरगिरी पेठशिवपूर धावडे भवानीमाळ धावडे ते कोकीसरे कडे जाणारा रस्ता 0.400 किमी, कोकीसरे नलवलाई वार्ड ते खालची आळी रस्ता 0.300 किमी, हुंबरणे मागासवर्गीय वस्ती रस्ता 0.500 किमी, काळगाव ते गुढे पाचगणी रस्ता भाग 6 किमी, भरेवाडी ते नाईकबा सावंतवाडी रस्ता 3 किमी, धामणी ते मस्करवाडी रस्ता 3 किमी, चव्हाणवाडी धामणी ते वरेकरवाडी रस्ता 4 किमी, कुठरे ते बादेवाडी धामणी रस्ता 2 किमी, पवारवाडी ते भोसगाव रस्ता 3 किमी, येळेवाडी ते पवारवाडी रस्ता 5 किमी, कसणी ते धनगरवाडा रस्ता 3 किमी, करपेवाडी ते कदमवस्ती रस्ता 2 किमी, प्रजिमा 29 ते सातारा पाटण रोड ते धरनगरवाडा मरड रस्ता 1.500 किमी, प्रजिमा 29 सातारा पाटण रोड ते धनगरवाडा मरड फाटा ते मरड 0.700 किमी, प्रजिमा 29 सातारा पाटण रोड  ते धनगरवाडा मरड फाटा ते मरड ते मिसाळवाडी रस्ता 3.500 किमी, प्रजिमा 29 सातारा पाटण रोड ते भिकाडी गाव रस्ता 2 किमी, प्रजिमा 29 सातारा पाटण रोड ते रामेल शेळकेवस्ती  रस्ता 1.500 किमी, वाटोळे केदारनाथ देवालय ते वाजेगाव शिव 1 किमी, टोळेवाडी गौरीच्या वाताकडे जाणारा रस्ता 1 किमी, टोळेवाडी चौककडे जाणारा रस्ता 1 किमी, टोळेवाडी सुंदरगडाकडे जाणारा रस्ता 1 किमी, म्हारवंड जि.प.शाळा ते  किकतचा झरा रस्ता 7 किमी, निवकणे कातकरी वस्ती ते ब्राम्हण वस्ती रस्ता 1 किमी, म्हारवंड मारुती पवार यांचे घर ते सुभाष पवार यांचे घर रस्ता 0.150 किमी, म्हारवंड मुख्य रस्ता ते जोगेश्वर मंदिर रस्ता 0.500 किमी, म्हारवंड रामचंद्र धोंडीबा बावधाने घर ते मसुरटे दारे रस्ता 1 किमी, म्हारवंड ते भारसाखळे मुख्य रस्ता 2 किमी, वाटोळे ता.पाटण संतोष पवार यांचे घराकडील रस्ता सुधारणा 0.400 किमी, वाटोळे फणसवाडी रस्ता सुधारणा 0.100 किमी, खुडुपलेवाडी मुख्य रस्ता ते मधलीवस्ती रस्ता 0.200 किमी, खुडुपलेवाडी मुख्य रस्ता ते गवळीवस्ती धनगरसमाज रस्ता 0.500 किमी, खुडुपलेवाडी गावठाण ते स्मशानभूमी रस्ता 0.500 किमी, मरड शाळा ते महाकाली मंदिर रस्ता भाग 1.500 किमी, शेंडेफाटा ते मराठवाडी रस्ता 2 किमी, जुंगटी ते पांगुळणेवस्ती ते मळयाचावाडा पोहोच रस्ता 5 किमी, धुईलवाडी काशिनाथ सपकाळ ते घाण्याची पटी रस्ता 0.800 किमी, धुईलवाडी दगडू सपकाळ ते क्रिकेट मैदान कुंबळे रस्ता 0.500 किमी, जाळगेवाडी ता.पाटण स्मशानभूमी ते धरण रस्ता 2 किमी, जाळगेवाडी मारुती मंदिर ते  भैरोबा मंदिर रस्ता 2 किमी, पाडळोशी स्मशानभूमी ते बाटेवाडी रस्ता 3.500 किमी, माजगाव माळवाडी ते खालकरवाडी शिव रस्ता 2 किमी, माजगाव गावठाण ते शंभू पाटील यांचे घर रस्ता 2.200 किमी, माजगाव महादेव मंदिर ते जोतिबा पाऊनकी मंदिर रस्ता 2 किमी, कडववाडी ते जोतिबा मंदिर ते कडववस्ती रस्ता 1.500 किमी, चाफळ बौध्दवस्ती ते काटेवस्ती रस्ता 1 किमी, चाफळ जानाई मंदिर जाधववाडी ते माजगाव रस्ता 2.300 किमी, चाफळ मातंगवस्ती ते दडावस्ती रस्ता 1.200 किमी, चव्हाणवाडी ग्रामपंचायत ते केळोली वरची रस्ता 1.700 किमी, माथणेवाडी स्मशानभूमी ते जाधववाडी रस्ता 1.900 किमी, बोर्गेवाडी डेरवण ते बोरगेवस्ती रस्ता 2 किमी, भोसगाव भांबूचीवाडी सरकारी आडापासून वसंत कदम यांचे घरापर्यतचा रस्ता 2 किमी, मराठवाडी  ढेबेवाडी जिंती रस्ता ते पाण्याच्या टाकीकडे वनहद्दी पर्यंतचा रस्ता 1.500 किमी, मंद्रुळकोळे ढेबेवाडी नाईकबा रोड ते पाण्याची टाकी रस्ता 1 किमी, उमरकांचन सतीआई मंदिर ते निनाईदेवी मंदिर रस्ता 2.300 किमी, कोळेकरवाडी ते अनुतेवाडी रस्ता 4 किमी, जिंती ते अनुतेवाडी रस्ता 1.200 किमी, मान्याचीवाडी ते खळे रस्ता 1.700 किमी, मान्याचीवाडी ते जाधववाडी रस्ता 1.900 किमी, मालदन गावातील अंतर्गत रस्ता गल्लीबोळ 2 किमी, मत्रेवाडी भैरवनाथ मंदिर ते मत्रेवाडी निवी रस्ता 2 किमी, सुतारवाडी बाटेवस्ती ते मालदन बंडेवाडी रस्ता 2 किमी, तामिणे नथूराम साळूंखे ते शंकर रासू साळूंखे घर रस्ता 1 किमी, तामिणे बंडू साळूंखे ते आनंदा साळूंखे घर रस्ता 0.300 किमी, तामिणे ग्रामपंचायत कार्यालय ते भगवान साळूंखे घर रस्ता 0.800 किमी, महिंद बौध्दवस्ती महिंद ते नविन वसाहत रस्ता 0.800 किमी, महिंद मठवाडी स्मशानभूमी रस्ता 0.500 किमी, सणबूर आळणी आंबा ते मानेवस्ती रस्ता 0.800 किमी, सणबूर बँक ऑफ इंडिया ते बौध्दवस्ती रस्ता 0.800 किमी, बनपूरी पेठबनपूरी ते स्मशानभूमीकडील रस्ता 0.400 किमी, बनपूरी हनुमान वार्ड ते नवीन वसाहत रस्ता 0.400 किमी, भालेकरवाडी ते शाळेकडे जाणारा रस्ता 0.400 किमी, जानुगडेवाडी पवारआळी ते गाडगौंड रस्ता 0.300 किमी, शितपवाडी पूल ते बेंद रस्ता 0.800 किमी, अंबवडे शिंदेवाडी शाळा ते वाघजाई मंदिर रस्ता 0.800 किमी, मणदुरे मारुती मंदिर ते मारगवाडी रस्ता 1 किमी, मणदुरे डफळवाडी प्राथमिक शाळा ते जन्नेवाडी बंधारा रस्ता भाग 2 किमी, मणदुरे पाटण जळव मणदुरे रस्ता 1 किमी, मणदुरे सुतारकी ते धोरश्वर हायस्कूल रस्ता 1 किमी, केरळ झरा पाणवठा ते नंदकुमार पवार यांचे घर  रस्ता 0.700 किमी, केरळ गुजर आवाड ते खाशाबा पवार यांचे घर रस्ता 0.250 किमी, मेंढोशी जे.व्ही.जाधव घर ते बबन यशवंत जाधव घर रस्ता 0.900 किमी, मेंढोशी प्राथमिक आरोग्य केंद्र ते दत्तात्रय विष्णू जाधव यांचे घर रस्ता 0.900 किमी, सुरुल निवृत्ती मारुती संकपाळ यांचे घर ते पाणवठा नदी रस्ता 0.800 किमी, साखरी नाना सावंत ते आत्माराम सुर्यवंशी यांचे घर रस्ता 0.500 किमी, धडामवाडी बापू ड्रायव्हर रामभाऊ सुर्ले ते धुमाळांचे घर  रस्ता 1.500 किमी, बिबी पाटण मणदुरे  रस्ता ते नवसरी मंदिर ते स्मशानभूमी रस्ता 0.700 किमी, येरफळे शंकर सुतार ते वाघजाई मंदिर रस्ता 6 किमी, येरफळे अजित कुंभार घर ते बंडू पडवळ घर रस्ता 4 किमी, येरफळे पाटील वाडेकरी ते शंकर पडवळ यांचे घर रस्ता 0.070 किमी, येरफळे जोतिबा मंदिर ते आनंदा पाटील घर रस्ता 0.050 किमी, येरफळे शंकर पाटील ते पांडूरंग कदमवस्ती यांचे घर रस्ता 0.150 किमी, काळोली कराड चिपळूण रस्ता ते काळोबा मंदिर रस्ता 1 किमी, तामकडे आंबेडकरवस्ती ते विहिरीपर्यंत रस्ता 0.900 किमी, बनपेठवाडी येराड रस्ता ते विजय ज्ञानदेव साळूंखे यांचे घर रस्ता 0.300 किमी, बनपेठवाडी येडोबा मंदिर ते जानूबाई रस्ता 0.300 किमी, येराड रामाचावाडा ते बौध्दवस्ती रस्ता 0.900 किमी, येराड कराड चिपळूण रस्ता ते ताल रस्ता 0.100 किमी, येराड जोतिबाचीवाडी ते रोमनवाडी रस्ता 1 किमी, येराड गुरवाळ ते खंडूचावाडा रस्ता 0.500 किमी, येराड खंडूचावाडा ते संपवेल रस्ता 0.500 किमी, येराड जोतिबाचीवाडी ते मिरासवाडी रस्ता 1 किमी, शिरळ मिरासवाडी रस्ता ते दत्त मंदिर रस्ता 0.700 किमी, शिरळ ताईचीवाडी ते सहान रस्ता 0.700 किमी, शिरळ मिरासवाडी हनुमान मंदिर ते दत्त मंदिर रसता 0.700 किमी, मारुल तर्फ पाटण बबन कदम घर ते सुदर्शन वाईकर घर रस्ता 0.700 किमी, मारुल तर्फ पाटण जोतिबा मंदिर ते गुरव  दगडू घर रस्ता 0.700 किमी, मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता0.300 किमी, मारुल तर्फ पाटण सुतारवस्ती अंतर्गत रस्ता 0.300 किमी, वांझोळे डोणीचावाडा ते जुगाईदेवी मंदिर रस्ता 0.500 किमी, किल्ले मोरगिरी सर्जेराव शिलवंत घर ते विलास सपकाळ यांचे घर रस्ता 0.800 किमी, लेंढोरी संजय सुर्वे यांचे घर ते काशिनाथ जाधव यांचे घर रस्ता 0.600 किमी, लेंढोरी नेरळे मेंढेघर रस्ता ते शिवनगर रस्ता 0.300 किमी, लेंढोरी संजय सुतार घर ते शिव मंदिर रस्ता सुधारणा 0.600 किमी, मणेरी चाफेर रस्ता ते कळकवणे वस्ती रस्ता 1 किमी, तळीये तळीये पश्चिम ते नहिंबे रस्ता सुतारवस्ती 1 किमी, काढोली भागू शेठ घर ते चाळकेंच घर रस्ता 0.700 किमी, रिसवड तुळशिराम बुवा घर ते रमेश पवार घर  रस्ता 0.700 किमी, गोठणे मुख्य रस्ता ते बौध्दवस्ती गाव अंतर्गत रस्ता 1 किमी, तळोशी फाटा ते वाघणे गाव अंतर्गत रस्ता 1 किमी, मणेरी मुख्य रस्ता मसवटा पासून ते विठ्ठलाई देवी मंदिर रस्ता 1 किमी, कोरिवळे गणपती मंदिर ते जनार्दन मिस्त्री यांचे घर रस्ता 1 किमी, टेळेवाडी भवानीमाता मंदिर ते गोसावी वस्ती मारुलहवेली रस्ता 2 किमी, मारुलहवेली दिवशी मारुल रस्ता ते गारवडे मोरगिरी रस्ता 1.500 किमी, पापर्डे बुद्रुक संभाजी बाबुराव देसाई यांची जमिन ते डबऱ्याचे क्षेत्र रस्ता 1 किमी, पापर्डे खुर्द काळी म्हारकी ते कुंभारकी रस्ता 1.500 किमी, चोपडी जोतिबा मंदिर ते राजाराम जाधव यांचे घर पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता 1 किमी, आडदेव सोमनाथ मंदिर ते खिंड रस्ता 1.500 किमी, आंब्रुळे मारुती मंदिर ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 1.500 किमी, आडूळ साटम आश्रम ते काळेवाडी अंगणवाडी रस्ता 1 किमी, आडूळ गावठाण ते काटकरी वस्ती व डूबल वस्ती रस्ता 1 किमी, मुळगाव मातंगवस्ती रस्ता 0.200 किमी, कवरवाडी स्मशानभूमी रस्ता 1 किमी, बेलवडे खुर्द आंब्रुळे ते साकव पूल खडी रस्ता सुधारणा 1 किमी, नवारस्ता कराड चिपळूण रोड ते सुषमा दिपक लुगडे यांचे घर रस्ता 0.250 किमी, नाडे मरळी कारखाना रोड ते शोभा शंकर लोहार यांचे घर रस्ता 0.250 किमी, नाडे काटेवाडी भिमराव पांडूरंग पवार ते उषाबाई कंदारे घर रस्ता 0.150 किमी, नाडे मरळी कारखाना रोड ते क्षेत्रपाल राईस मिल रस्ता 0.750 किमी, मल्हारपेठ ते कराड चिपळूण रसता ते शिवाजीनगर अंतर्गत रस्ता 1 किमी, मल्हारपेठ गणेश कॉलनी येथील रघुनाथ पानस्कर घर ते अभिजित पानस्कर यांचे घर रस्ता 0.500 किमी, मल्हारपेठ दिंडूकलेवाडी अंतर्गत मनोज चव्हाण यांचे घराकडे जाणारा रस्ता 0.500 किमी, मल्हारपेठ शिवदौलत बँक ते मातंगवस्ती एअरटेल टॉवरकडे जाणारा रस्ता 0.500 किमी, मल्हारपेठ बाजारपेठ जमदाडेंचे घर ते मार्केट यार्डकडे जाणारा रस्ता 0.500 किमी, मल्हारपेठ  शिवाजीचौक ते मारुती मंदिर रस्ता 0.500 किमी, मल्हारपेठ मोहिते वस्ती ते बौध्दवस्ती रस्ता 0.500 किमी, नारळवाडी ते मल्हारपेठ दिंडूकलेवाडी रस्ता 1 किमी, नारळवाडी बसस्टॉप ते रुद्रेश्वर मंदिर रस्ता 1 किमी, नारळवाडी ते नवसरवाडी रस्ता 1 किमी, येराडवाडी मानसिंग शामराव देसाई यांचे घर ते बयाजी आत्माराम देसाई यांचे घराकडील रस्ता 0.750 किमी, येराडवाडी हरी आनंदा देसाई यांचे घर ते कृष्णत देसाई यांचे घर रस्ता 0.750 किमी, जमदाडवाडी कुंडलिक कदम यांचे घर ते कोयना नदी जुना पाणवठा रस्ता 0.500 किमी, जमदाडवाडी अरुण पाटील यांचे घर ते ओढा ते शेतापर्यतचा रस्ता 0.500 किमी, जमदाडवाडी ते नारळणवाडीकडे जाणारा रस्ता 0.500 किमी, मंद्रुळहवेली सामाजिक सभागृह ते हिंदूराव चव्हाण यांचे घर रस्ता 0.500 किमी, मंद्रुळहवेली श्रीरंग कोळी ते अंगणवाडीकडे जाणारा रस्ता 0.500 किमी, आबदारवाडी ते ऊुरल घाट रस्ता 1 किमी, निसरे जूनी फरशी ते नवीन पूलाला जोडणारा रस्ता 0.500 किमी, वेताळवाडी निसरे मारुल रस्त्यापासून ते वेताळवाडी मातंगवस्ती रस्ता 1 किमी, नावडी स्मशानभूमी ते चावर रस्ता 1 किमी, नावडी खारुती क्षेत्र ते चिंचेखालचा मळा रस्ता 1 किमी, सोनाईचीवाडी खिलारवाडी दिनकर नाना यांचे घर ते स्मशानभूमी रस्ता 0.500 किमी, सोनाईचीवाडी उत्तम जाधव यांचे घर ते गावओढया पर्यंतचा रस्ता 0.500 किमी, सोनाईचीवाडी लक्ष्मी जाधव यांचे घर ते बाळासो कोळी यांचे घरापय्रंतचा रस्ता 0.500 किमी, सोनाईचीवाडी संजय जाधव यांचे घर ते नाथा जाधव यांचे घरापर्यंतचा रस्ता 0.500 किमी, सोनाईचीवाडी कुणाजी कोळी यांचे घर ते शिवाजी शिंदे यांचे घर रस्ता 0.500 किमी, नहिंबे चिरंबे सहारा लॉज ते साळवी सदरन रस्ता 0.500 किमी, नहिंबे चिरंबे कराड चिपळूण रोड ते जोतिबा मंदिर रस्ता 1 किमी, विहे चव्हाण मळा अंतर्गत रस्ता 0.800 किमी, विहे हनुमान वार्ड युवराज पाटील यांचे घरापासून ते बेघरवस्ती रस्ता 0.800 किमी, विहे सुरेश संकपाळ यांचे घ्ज्ञर ते शशिकांत माने यांचे घर रस्ता 0.800 किमी, विहे मस्जिद ते वसंत संकपाळ यांचे घर रस्ता 0.800 किमी, शेडगेवाडी आंनदा गणवे यांचे घर ते शिवार रस्ता 0.800 किमी, शेडगेवाडी हणमंत यादव यांचे घर ते नानासो थोरात यांचे घर रस्ता 0.800 किमी, शेडगेवाडी शंकर यादव ते मोहन यादव यांचे घर रस्ता 0.800 किमी, ऊरुल बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता 0.800 किमी, ऊरुल अंतर्गत रस्ते 0.500 किमी, ठोमसे पाण्याची टाकी ते इश्वर ओढा रस्ता 0.800 किमी, ठोमसे तांबेवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्ता 0.500 किमी, ठोमसे बाळासो माने ते पाण्याची टाकीपर्यंतचा रस्ता 0.500 किमी, ठोमसे शंभूराज मंदिर ते त्र्यंकेश्वर मंदिर रस्ता 1 किमी, ठोमसे पाण्याची टाकी ते रघुनाथ कदम यांचे घर रस्ता 0.500 किमी, ठोमसे पाण्याची टाकी ते लक्ष्मण कदम यांचे घर रस्ता 0.500 किमी, बोडकेवाडी निवृत्ती आप्पा देसाई यांची वस्ती ते पांडववड रस्ता 0.500 किमी, बोडकेवाडी अशोक देसाई यांचे घर ते गावाची बोअर पर्यंतचा रस्ता 0.500 किमी, नवजा मुख्य रस्ता लाँच धक्का पणशी रस्ता 1.500 किमी, रासाटी कराड चिपळूण रोड ते वनसंशोधन नर्सरी रस्ता 2 किमी, कामरगाव स्मशानभूमी रस्ता 0.300 किमी, कोयनानगर लाँच धक्का ते महादेव वाडी रस्ता 1 किमी, तोरणे रस्ता ते ढोकावळे वस्ती रस्ता 5 किमी, देशमुखवाडी रस्ता 0.500 किमी, तांबवे साई मंदिर ते उत्तर तांबवे रस्ता 3 किमी, दक्षिण तांबवे ते किरपे शिवार रस्ता 2 किमी, भोळेवाडी प्रकाश निवृती सुर्यवंशी यांचा गोठा ते ज्ञानदेव येराडकर यांचे घर 0.500 किमी, भोळेवाडी मारूती मंदिर ते नारायण बर्गे यांचे घर 0.300 किमी, कराड पाटण रोड ते भोळेवाडी कारमाळ तसेच बेलदरे जाणारा रस्ता 4 किमी, म्होप्रे बेघरवस्ती ते डुबलवस्ती रस्ता 1.500 किमी, तांबवे फाटा ते नवनाथ सुर्वे वस्ती रस्ता 1.500 किमी, सुपने बिभेसन पाटील यांचे घरापासून ते अरविंद भोसले यांचे घर 0.300 किमी, मौजे साकुर्डी कराड पाटण रोड डोंगरीमाळ साळुंखे मळा ते जोमलिंग रस्ता 1.500 किमी, आबईचीवाडी वायदंडे घरापासून ते धनगर समाजमंदिर 500 मी. रस्ता, केसे दफन भुमी ते वारूंजी शिव रस्ता 2 किमी, गमेवाडी सटवाई ते पाझर तलाव वर्पेवस्ती 1 किमी, आरेवाडी कणसे मळा ते गाव विहीर  रस्ता 0.600 किमी, साजूर संपत चव्हाण बापू यांची बोर ते भरत कचरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता 1.500 किमी, पाठरवाडी ग्रा.मा.147 ते साजूर तळी रस्ता 2 किमी कामांचा समावेश असून या शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

Comments

Popular posts from this blog

रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसादिवशी परगावी जाणार.

ऊस गळीत हंगाम सन२०२४/२५ साठी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ