लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दौलतनगर येथे दि.10 मार्च रोजी 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम.

 


दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.श्री.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि.10 मार्च, 2024रोजी सकाळी 10.00 दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. असे हे पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दि.10 मार्च, 2024 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून  स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 114 वा जयंती सोहळा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि.10 मार्च, 2024रोजी सकाळी 10.00 दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे संपन्न होणार आहे.स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

 


Comments

Popular posts from this blog

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजना अंतर्गत पाटण विधानसभा मतदार संघातील 151 गावातील 297 कि.मी.अंतराच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी

रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसादिवशी परगावी जाणार.

ऊस गळीत हंगाम सन२०२४/२५ साठी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ