Posts

Showing posts from July, 2024

युवकांनी समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे- पोलीस अधिक्षक समीर शेख. स्व.शिवाजीराव देसाई यांचा 38 वा पुण्यतिथी कार्यक्रम दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न.

Image
  दौलतनगर दि . 12 :- स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज संपन्न होत आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे निमित्त असून या गुणवंत विद्यार्थ्यांना असेच प्रोत्साहन दिल्याने त्यांना चांगली प्रेरणा मिळून ते यशस्वी होणार आहेत.भविष्यामध्ये याच गुणवंत विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होणार असून यशस्वी होणाऱ्या युवकांनी आपल्या मायभूमीसाठी,समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री.समीर शेख यांनी केले.              ते दौलतनगर,ता .पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे 38 व्या पुण्यतिथी कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा),मा.आदित्यराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन श्री.संजय देशमुख...

पाटण मतदारसंघातील 548 जिल्हा परिषदेच्या 12 हजार 586 विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेला यश मा.यशराज देसाई यांचे हस्ते वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वहयांचे वाटप.

Image
  दौलतनगर दि .05 :- पाटण तालुका हा दुर्गम डोंगराळ असला तरी या तालुक्याचा   शैक्षणिक दर्जा नेहमीच उंचावलेला पाहवयास मिळतो.पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई ज्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री असताना संपूर्ण राज्यात शैक्षणिक इबीसी सारखी सवलत जाहीर करून सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची दारे खुली करून दिली परिणामी संपूर्ण देशात महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात प्रगतशील राज्य म्हणून नावारूपास आणले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेच नातू आणि राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह वहयांचे   वाटप करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांच्या हस्ते आज वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप करण्यात आले.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळांमधील 12586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागातील व गावातील पदाधिका...