युवकांनी समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे- पोलीस अधिक्षक समीर शेख. स्व.शिवाजीराव देसाई यांचा 38 वा पुण्यतिथी कार्यक्रम दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न.
दौलतनगर दि.12:-स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या
पुण्यतिथीनिमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज संपन्न होत आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
हे निमित्त असून या गुणवंत विद्यार्थ्यांना असेच प्रोत्साहन दिल्याने त्यांना
चांगली प्रेरणा मिळून ते यशस्वी होणार आहेत.भविष्यामध्ये याच गुणवंत
विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून शासकीय
अधिकारी होणार असून यशस्वी होणाऱ्या युवकांनी आपल्या मायभूमीसाठी,समाजासाठी आपले
योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री.समीर
शेख यांनी केले.
ते दौलतनगर,ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे 38
व्या पुण्यतिथी कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा),मा.आदित्यराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे
चेअरमन श्री.संजय देशमुख,माजी चेअरमन ॲङमिलिंद पाटील, अशोकराव पाटील,जयवंतराव
शेलार,सभापती बाळासाहेब पाटील,उपसभापती विलास गोडांबे,जालंदर पाटील,संतोष
गिरी,बबनराव शिंदे,सुरेश पानस्कर,विलास कुराडे,मनोज मोहिते,अंकूश महाडीक,जोतिराज
काळे,रणजित पाटील,आर.बी.पवार,ॲङडी.पी.जाधव,अभिजित पाटील,भरत साळूंखे,बबनराव
भिसे,सर्जेराव जाधव,दादासो जाधव,शशिकांत निकम,शंकर पाटील,सुनील पानस्कर,उपविभागीय
अधिकारी सुनील गाडे,तहसिलदार अनंत गुरव यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती
होती.यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ते
पुढे म्हणाले की, सध्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे खूप गरजेचे असून या
विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकांचेही त्यांच्या यशामध्ये मोठे योगदान असते.या
गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये समाजामध्ये काय आहे हे न पाहता आपली आवड
कशामध्ये आहे तो विषय निवडून कष्ट करण्याची
तयारी ठेवली तर यश नक्की मिळते. यश हे केवळ एका दिवसात मिळत नाही तर
त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेच लागतात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळया
संधी निर्माण होतील.स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून काही विद्यार्थी हे अधिकारी
म्हणून शासकीय सेवतही जातील.परंतु हे सगळ काही करत असताना आपण स्वता:च्या भागाला
विसरु नका. ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला आहे त्या मातीसाठी आपण काही देणे
लागतो.त्यामुळे आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी योगदान देणे हे कर्तव्य असून आपल्या
भागातील अडी-अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे स्पष्ट केले.
योवळी बोलताना चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) म्हणाले की,लेाकनेते बाळासाहेब
देसाई यांचे शब्दाखातर स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी मरळीच्या माळरानावर
साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी घेतली. आपल्या वडीलांचे शब्दाखातर यशस्वी
उद्योजक असलेल्या स्व.आबासाहेब यांनी या डोंगराळ भागात साखर कारखाना उभारण्याचे
शिवधनुष्य पेलले. फक्त साखर कारखाना उभा केला नाही तो यशस्वीरित्या चालवत
अल्पावधीमध्ये कर्जमुक्त करुन शेतकऱ्यांच्या मालकीचा केल्याचे सांगत पालकमंत्री
ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून स्व.आबासाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार प्रतिवर्षी करत असतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक
परिक्षांमध्ये यशस्वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 10 व 12 वी
नंतर कोणते क्षेत्र निवडायचे हा प्रश्न असतो.त्यांना मार्गदर्शनाची खरी गरज असते.आज पुण्यतिथी कार्यक्रमाचे निमित्ताने
सर्वात अवघड असलेली युपीएससी परिक्षेतून यशस्वी झालेल्या पोलीस अधिक्षक समीर शेख
यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना एक चांगली
प्रेरणा मिळेल हाच या कार्यक्रमाचा हेतू असून माध्यमिक व उच्चमाध्यमिकच्या
शिक्षणानंतर केवळ पदवी पर्यंतचे शिक्षण घेण इथपर्यंतच विद्यार्थ्यांचे ध्येय
नको.तर चांगला अभ्यास करुन स्पर्धा परिक्षांमधून शासकीय अधिकारी होण्यासाठी
विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे स्पष्ट करत राज्याचे मुख्यमंत्रीना.एकनाथजी
शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरु केली असून
शिवदौलत सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये या योजनेसाठी आवश्यक असलेले बँकेचे खाते
उघडण्यासह या योजनेची सर्व माहिती दिली जात असून राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ
सामान्य महिलेपर्यंत देण्याचे काम येणाऱ्या काळात केले जाणार असून या योजनेचा लाभ
घेण्यासाठी महिलांनी शिवदौलत बँकेच्या सर्व शाखांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहनही
त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे स्वागत व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले
तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.
Comments
Post a Comment