पाटण मतदारसंघातील 548 जिल्हा परिषदेच्या 12 हजार 586 विध्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेला यश मा.यशराज देसाई यांचे हस्ते वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वहयांचे वाटप.
दौलतनगर दि.05:- पाटण तालुका हा दुर्गम डोंगराळ असला तरी या तालुक्याचा शैक्षणिक
दर्जा नेहमीच उंचावलेला पाहवयास मिळतो.पाटण तालुक्याचे सुपुत्र स्व. लोकनेते
बाळासाहेब देसाई ज्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री असताना संपूर्ण राज्यात शैक्षणिक
इबीसी सारखी सवलत जाहीर करून सर्वसामान्य जनतेला शिक्षणाची दारे खुली करून दिली
परिणामी संपूर्ण देशात महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात प्रगतशील राज्य म्हणून
नावारूपास आणले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेच नातू आणि राज्याचे उत्पादन
शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या
संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय
साहित्यासह वहयांचे वाटप करण्यात आले. लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांच्या हस्ते
आज वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना
शालेय वहयांचे वाटप करण्यात आले.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील 548 जिल्हा परिषद शाळांमधील
12586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागातील व गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक
यांचे हस्ते शालेय साहित्यासह 50 हजार वहयांचे
वाटप करण्यात आले. ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतील या उपक्रमाबद्दल पालकवर्गातून
समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे
भेटी साठी येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटीसाठी येताना हार,शाल
,नारळ,पुष्पगुच्छ इ. साहित्य न आणता शालेय वहया व वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहन
वेळोवेळा केले होते. तसेच प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या ना.शंभूराज
देसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून शुभेच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते त्या हारतुऱ्यांचे
महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावावी लागत
असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या
हेतूने वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी या अगोदरच
केले आहे. त्यांचे या आवाहनाला मतदारसंघातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. हाच पायंडा लग्नसमारंभ
तसेच इतर सत्कार समारंभाच्या निमित्ताने
राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी
ना.शंभूराज देसाई यांना भेट म्हणून मिळणाऱ्या वहया तसेच शालेय साहित्य हे
मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून मतदारसंघात
वाटप करण्यात येत असते. तर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये साजरा झालेल्या ना.शंभूराज देसाई यांच्या
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना हार,शाल ,नारळ,पुष्पगुच्छ इ. साहित्य न आणता वहितुला करण्याचे आावाहन ना.शंभूराज देसाई
वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले होते. करण्यात आलेल्या आवाहनानुसार ना. शंभूराज देसाई यांच्या
वाढदिवसा दिवशी पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामपंचायती तसेच विविध संस्थांनी मोठया
प्रमाणांत वहीतुला करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ना.शंभूराज देसाई यांच्या
संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांच्या
हस्ते आज वस्ती साकुर्डी,तांबवे व मारुलहवेली येथील जिल्हा परिषद शाळांमधील
विद्यार्थ्यांना शालेय वहयांचे वाटप करण्यात आले.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील
548 जिल्हा परिषद शाळांमधील 12586 विद्यार्थ्यांना त्या-त्या विभागातील व गावातील
पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक यांचे हस्ते वहयांचे वाटप करण्यात आले.
चौकट: शालेय विद्यार्थ्यांना वहया वाटप
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी-चेअरमन
यशराज देसाई.
ना.शंभूराज देसाई यांनी वाढदिवसाला तसेच भेटायला
येताना व इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना हार तुरे न आणता शालेय साहित्य घेऊन येण्याचे
आवाहन केले होते.त्यानुसार मोठया प्रमाणांत वहया जमा झाल्या होत्या. ना.शंभूराज
देसाई यांचे संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण विधानसभा मतदारसंघातील
548 जिल्हा परिषद शाळेमधील 12586 विद्यार्थ्यांना 50 हजार वहयांचे वाटप आज एकाच
दिवशी होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून आपण
प्रतिवर्षी वहया वाटप करत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना केलेले
वहया वाटप हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी याप्रसंगी केले.
Comments
Post a Comment