लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते शनिवार दि.02 नोव्हेंबर रोजी 51 वा गळीत हंगामाचा शुभारंभ - पांडूरंग नलवडे व्हा.चेअरमन.

दौलतनगर दि . 31 :- दौलतनगर , ता . पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२ 4 - २ 5 मधील 51 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम शनिवार दि.02 नोव्हेंबर , २०२ 4 रोजी सकाळी 11.00 वा . लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक , नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा . सौ . स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा . श्री . रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ १ 1 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे . पत्रकात म्हंटले आहे की , चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे . कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी ...