लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 11 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते शनिवार दि.02 नोव्हेंबर रोजी 51 वा गळीत हंगामाचा शुभारंभ - पांडूरंग नलवडे व्हा.चेअरमन.

 

 दौलतनगर दि.31:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२4-5 मधील 51 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम शनिवार दि.02 नोव्हेंबर,२०२4 रोजी सकाळी 11.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ 1 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ 1 सभासद श्री.रामचंद्र उत्तम करपे करपेवाडी, श्री.रामराव पांडूरंग देशमुख भोसगाव,श्री.श्रीपती गणपती घाडगे(चव्हाण) पाळेकरवाडी, श्री.बबन श्रीपती सुर्यवंशी दिवशी बु, श्री.आप्पासो पांडूरंग अपसिंगे सोनाईचीवाडी,श्री.शिवाजी बबन काटे जाळगेवाडी, श्री.ज्ञानू गणपत जाधव आंबळे, श्री.शरद मुगुटराव पाटील विहे,श्री.बाळाराम रामचंद्र सुर्यवंशी चौगुलेवाडी सांगवड,श्री.संपत धोंडीराम सावंत साखरी, श्री.बबन बंडू साळूंखे येराड  या 1 ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.02 नोव्हेंबर, २०२4 रोजी सकाळी 11.00 वा. संपन्न होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक श्री.सोमनाथ हिंदुराव खामकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषा सोमनाथ खामकर यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी पत्रकात केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.