चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा.
दौलतनगर
दि.08:-
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा
व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व
पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे
चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा गुरुवार दि.१0ऑक्टोंबर,२०२4 रोजीचा वाढदिवस शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान
वाढदिनी सकाळी 10.00 वा. विजयनगर ता.कराड ते दौलतनगर ता.पाटण अशी दुचाकी रॅली
आयोजित केली असून दुपारी 12.30 वा. भव्य युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले असून या
मेळाव्यास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे उपस्थित राहून संबोधित करणार आहेत तर चेअरमन
मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा)
यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.मा.यशराज देसाई
(दादा) हे दुपारी 03.00 वा.
पर्यंत शिवविजय हॉल,दौलतनगर येथे शुभेच्छा स्विकारणार असल्याचे मा.
यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई
(दादा) यांचा वाढदिवस प्रतिवर्षी
मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक
उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्याही वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांचे सोमवार दि. १0 ऑक्टोंबर,२०२4 रोजीचे वाढदिवसा निमित्त
शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने
विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मा. यशराज देसाई यांचे
उपस्थितीत सकाळी 10.00 वा. विजयनगर,ता.कराड
येथून तांबवे, विहे, मल्हारपेठ, नाडे नवारस्ता मार्गे दौलतनगर पर्यंत युवकांची भव्य
दुचाकी रॅली आयोजित केली आहे. दुपारी 01.00 वा. दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान
दौलतनगर ता.पाटण येथे युवा संवाद मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई हे उपस्थित राहून संबोधित करणार आहेत तर चेअरमन मा.यशराज देसाई(दादा)
व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार
आहे. या युवा संवाद मेळाव्यानंतर मा.यशराज देसाई(दादा) यांचे दौलतनगर,ता.पाटण
येथील निवासस्थानी आगमन होणार असून
शिवविजय हॉल येथे वाढ दिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
व शिक्षण समुहातील विविध संस्थांचेवतीने वाढदिवसानिमित्त सत्कार स्विकारल्यानंतर
उपस्थित पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक यांचेकडून
दुपारी 03 वाजेपर्यंत शुभेच्छा स्विकारणार
आहेत. दरम्यान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता येणा-या कार्यकर्ते पदाधिकारी
यांनी पुष्पगुच्छ,हार न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब कुटुंबातील
शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहनही
शेवटी मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समितीचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत
करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment