सातारा जिल्हयात नंबर एकचा विधानसभा मतदारसंघ बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार- आमदार शंभूराज देसाई दौलतनगर ता.पाटण येथे शिवसेना भाजपा महायुतीचा आभार मेळावा संपन्न.

दौलतनगर दि . 08 :- नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण गत दहा वर्षामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गावा-गावांमध्ये केलेली विकास कामे घेऊन सर्व सामान्य मतदारांपुढे गेलो, तर विरोधक हे केवळ नाहक टिका टिपण्णी करण्यात व्यस्त राहिले.मतदार संघातील जनतेने सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या व विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला या निवडणुकीमध्ये भरघोस असे मताधिक्य मिळाले.याचे सर्व श्रेय हे पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदार बंधू भगिनींचे असून सत्तेच हवा डोक्यात न जाता जनतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कार्यरत राहण्याचे आवाहन करत यापुढील काळामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्हयातील नंबर एकचा मतदारसंघ बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी केले. दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित शिवसेना भाजपा महायुतीतील पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांच...