सातारा जिल्हयात नंबर एकचा विधानसभा मतदारसंघ बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार- आमदार शंभूराज देसाई दौलतनगर ता.पाटण येथे शिवसेना भाजपा महायुतीचा आभार मेळावा संपन्न.

 


 

दौलतनगर दि.08:- नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण गत दहा वर्षामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गावा-गावांमध्ये केलेली विकास कामे घेऊन सर्व सामान्य मतदारांपुढे गेलो, तर विरोधक हे केवळ नाहक टिका टिपण्‌णी करण्यात व्यस्त राहिले.मतदार संघातील जनतेने सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या व विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला या निवडणुकीमध्ये भरघोस असे मताधिक्य मिळाले.याचे सर्व श्रेय हे पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदार बंधू भगिनींचे असून सत्तेच हवा डोक्यात न जाता जनतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कार्यरत राहण्याचे आवाहन करत यापुढील काळामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्हयातील नंबर एकचा मतदारसंघ बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंभूराज देसाई  यांनी  केले.

        दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित शिवसेना भाजपा महायुतीतील पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांचे आभार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा),चि.जयराज देसाई,डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङ डी.पी.जाधव,ॲङ मिलिंद पाटील,प्रदिप पाटील,हणमंतराव चव्हाण,प्रकाश पाटील, पंजाबराव देसाई,विलास गोडांबे,अशोकराव डिगे,भरत साळुंखे,बबनराव भिसे,बाळासो पाटील,बाळासो खबाले पाटील,संजय देसाई,सुरेश पानस्कर,आर.बी.पवार,भागोजी शेळके,सावळाराम लाड,अशोकराव पाटील,विकास गिरी गोसावी,संतोष गिरी,चंद्रकांत पाटील,संजय देशमुख,गणेश पाटील,नानासो सावंत,डी.आर.पाटील,कविता कचरे,श्वेता शिंदे,पांडूरंग नलवडे यांचेसह शिवसेना-भाजपा महायुतीतील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

             याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये शिवसेना भाजपा महायुतीला प्रचंड बहुमत दिले असून राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी  गत दहा दिवसांपासून मुंबईमध्ये रहावे लागले.मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यासाठी एक दिवस वेळ काढून हा आभार मेळावा आयोजित केला.खर तर या विधानसभा निवडणुकीमध्ये मी केलेल्या आवाहनाला मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी शब्द झेलत भरघोस मताधिक्य दिले असून या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण गत दहा वर्षामध्ये केलेली विकास कामे घेऊन आपण जनतेसमोर मत मागायला गेलो.परंतु विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करत वैयक्तिक तसेच पक्ष संघटनेवर सोशल मिडीयावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली,तरी आपण कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले होते.आपल्या सर्व सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन हि निवडणुक हातात घेतल्याने आपल्याला भरघोस मताधिक्य मिळाले असून सत्तेची हवा कार्यकर्त्यांनी डोक्यात जाऊ न देता जनतेची अडी अडचणी सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे असून या पुढील काळात मी स्वत: विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, गेली चाळीस वर्षे विरोधकांची एक हाती सत्ता असलेली बाजार समितीची सत्ता ही सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या हातात देण्यासाठी बाजार समितीमध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी आपण सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या एकीच्या बळावरआपण प्रयत्न केले.त्यामुळे या बाजार समितीमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवत शेतकऱ्यांच्या हातामध्ये बाजार समितीची सत्ता आली. तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचा दुरुपयोग करत पोलीस यंत्रणेवर दबाव तंत्रांचा  वापर करुन केसेस दाखल करण्याचा प्रकार सुरु असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार सुरु असून जनतेसाठी सतत काम करणाऱ्या नेतृत्वाला जनतेने निवडून दिले असून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी  कधीही कमी पडणार नाही. कारण मल्हारपेठ येथील सांगता सभेमध्ये जे आव्हान केले त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केले, कष्ट घेतले प्रामाणिक मेहनत केली माझा शब्द झेलायचं काम केलं, त्या पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नतमस्तक होण्यासाठी हा जाहिर आभार मेळावा आयोजित केला असून विकास कामांची प्रक्रिया कायम यापुढेही सुरु राहणार असून पाटण विधानसभा मतदारसंघाचे सर्वांगीण विकासासाठी या पुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे शेवटी त्यांनी  सांगीतले.  

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.