लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

दौलतनगर दि .18 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चा गळीत हंगाम राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्यण मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेलया ऊसाच्या अंतिम एफ.आर.पी.पोटी रु. 200/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु. 4.10 कोटी संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये 205000.589 मे. टन ऊस गाळप करुन सरासरी 11.71 टक्के साखर उताऱ्याने 240040 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याची सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये एफ.आर.पी.पोटी रु. 2700/-प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु.55.35 कोटी रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच कारखान्याने चालू हंगाम 2024-25 मधील साखर उतारा व तोडणी वाहतुक खर्च वजा जाता त्यावर परिगणना करुन उर्वरित अं...