लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

 

 

दौलतनगर दि.18:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चा गळीत हंगाम राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्यण मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेलया ऊसाच्या अंतिम एफ.आर.पी.पोटी रु. 200/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु. 4.10 कोटी संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

       पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये 205000.589 मे. टन ऊस गाळप करुन सरासरी 11.71 टक्के साखर उताऱ्याने 240040 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याची सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये एफ.आर.पी.पोटी रु. 2700/-प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु.55.35 कोटी रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच कारखान्याने चालू हंगाम 2024-25 मधील साखर उतारा व तोडणी वाहतुक खर्च वजा जाता त्यावर परिगणना करुन उर्वरित अंतीम एफ.आर.पी.पोटी रक्कम रु.165.49 अधिकचे रु. 34.51/- असे एकूण रु. 200/- प्र.मे.टन प्रमाणे एफ.आर.पी.प्रमाणे देय होणारे रु. 3.39 कोटी व अधिकचे रु. 71.00 लक्ष असे एकूण 4.10 कोटी आज संबंधित ऊस पुरवठादारांच्या बॅंक खाती 18 ऑगस्ट 2025 रोजी वर्ग केली असून कारखान्याने सन 2024-25 च्या गळीत हंगामामध्ये गळीतास आलेलया ऊसाला एफ.आर.पी.प्रमाणे होणारी 100 टक्के ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादार सभासद  व शेतकरी यांचे खाती वर्ग केली आहेत. तरी ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा असे ही म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2025-26 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु केली असून ऊस तोडणी वाहतुकीचे कराराचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच कारखान्यातील ऑफ सिझन मेंटेनन्सचे कामकाज प्रगतीपथावर आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकवलेा सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.