मा.रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित . वाढदिनी परगावी जाणार असल्याने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे आवाहन.
दौलतनगर दि.07:- महाराष्ट्र राज्याचे
पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण
मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे बंधू व मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई(दादा) यांचा मंगळवारी दि. 12 ऑगस्ट
रोजी 54 वाढदिवस असून चालू वर्षी निष्पाप भारतीय पर्यटकांवर पेहलगामा येथे
झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप भारतीय पर्यटक शहिद झाले व अहमदाबाद
येथील एअर इंडीयाच्या विमान दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशी मृत्यमुखी पडले तसेच यंदा
20 मे पासून सुरु असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील
शेतकऱ्यांची हानी झाली आहे.त्यामुळे मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय वाढदिवस
नियेाजन समितीने घेतला असून कार्यकर्ते व हितचिंतक यांनी वाढदिवसाचे बॅनर लावू
नयेत व वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊ नयेत असे आवाहनही वाढदिवस नियोजन
समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे वाढदिवसाचे
निमित्ताने पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,सातारा यांचे वतीने प्रतिवर्षी
पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असेलल्या गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ व
सेवानिवृत्त सेवकांचा सेवा गौरव समारंभ हा संयुक्तिक कार्यक्रम सातारा या ठिकाणी
संपन्न होत असतो. परंतु सदरचा कार्यक्रम मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे वाढदिनी
सातारा या ठिकाणी उपस्थित नसल्याने यथावकाश या कार्यक्रमाची वेळ,तारीख व ठिकाण
नंतर कळविणेत येईल. दरम्यान मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे या दिवशी आपल्या
कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असून ते शिवविजया या सातारा निवासस्थानी व
दौलतनगर,ता.पाटण कारखानास्थळी उपलब्ध होणार नाहीत. तरी सातारा जिल्हा तसेच पाटण
तालुक्यातील समाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर,युवा कार्यकर्ते,हितचिंतक
यांना कळविणेत येते की दि. 12 ऑगस्ट रोजीचे वाढदिनी मा.श्री.रविराज देसाई(दादा) हे
वाढदिवसानिमित्त फोनव्दारे व सोशल मिडीयाव्दारे शुभेच्छा स्विकारणार असल्याची
माहिती शेवटी वाढदिवस नियोजन
समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली
आहे.
Comments
Post a Comment