Posts

Showing posts from October, 2025

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

Image
  दौलतनगर दि .06:- महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा दि. 10 ऑक्टोंबर   रोजीचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नुकतेच मराठवाडया सह सातारा जिल्ह्या मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे मोठे थैमान घातल्याने या विभागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन येथील सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.या विभागातील अनेक क...

गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- चेअरमन यशराज देसाई. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 52 वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.

Image
  दौलतनगर दि .0 3 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाचे संचालक मंडळ आर्थिक शिस्त ठेऊन काम करत असून सभासदांवर कर्जाचा बोजा होणार नाही या धोरणाला प्राथमिकता देण्यात आली आहे. गत काही वर्षामध्ये ऊस दराचा पहिला हप्ता देण्याच्या रकमेमध्ये आपण प्रतिवर्षी वाढ करत असून यावर्षी जिल्हयातील इतर कारखान्यांनी अद्यापही ऊसाचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात धोरण जाहिर केले नसल्याने इतर कारखान्यांचे बरोबरीने पहिला हप्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळ गळीत हंगाम सुरु करताना घेईल.त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास गळीतास देऊन सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी केले.               लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ च्या ५२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि-प्रदीपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. यावे...