चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

 

दौलतनगर दि.06:- महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि. 10 ऑक्टोंबर  रोजीचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नुकतेच मराठवाडयासह सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे मोठे थैमान घातल्याने या विभागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन येथील सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.या विभागातील अनेक कुटुंबे ही उघडयावर पडली. त्यांचा उदर निर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने आपदग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून चेअरमन मा.यशराज देसाई दादा यांचे वाढदिवसादिवशी त्यांचे उपस्थितीमध्ये वाहनांमधून संसारउपयोगी साहित्य आपदग्रस्त कुटुंबियांना रवाना केले जाणार आहे.तदनंतर सकाळी 09.30 वा. निसरेफाटा येथून दौलतनगरपर्यंत युवकांच्या भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच पाटण तालुक्यातील पहिले शिवतिर्थ असलेल्या नाडे नवारस्ता येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा परिसरामध्ये करण्यात आलेल्या सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा यशराज दादा यांचे उपस्थित होणार आहे. दुचाकी रॅलीने कारखाना कार्यस्थळ दौलतनगर ता.पाटण येथे आल्यानंतर येथील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुर्णाकृती पुतळा,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुतळा व समाधी या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केल्यानंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाई देवी दर्शन घेऊन या ठिकाणी मरळी ग्रामस्थांचेवतीने वाढदिवसाचे अभिष्टचिंतन कार्यक्रम झाल्यानंतर कै.सौ.वस्त्सलादेवी देसाई यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच मा.यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेवतीने वहितूला करण्यात येणार आहे. त्यानंतर दौलतनगर या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील युवक संवाद मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. युवा मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.युवा मेळावा संपन्न झाल्यानंतर  दौलतनगर या ठिकाणी तालुक्यातील युवक,हितचिंतक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून शुभेच्छा स्विकारणार आहेत. शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होऊन दौलतनगर ता.पाटण येथे आयोजित केलेल्या युवा मेळाव्यास पाटण विधानसभा मतदारसंघातील युवा कार्यकर्ते,पदाधिकारी,हितचिंतक यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन मा.यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

          चेअरमन मा.यशराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भेटण्यासाठी येणारे युवा कार्यकते,पदाधिकारी,हितचिंतक यांनी शुभेच्छा देण्याकरीता हार,तुरे आणू नयेत असे सांगत वाढदिवसानिमित्त शालेय वहया तसेच शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात देण्यात यावे जेणेकरुन या शैक्षणिक साहित्याचा लाभ हा पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना होईल. वाढदिवसा दिवशी हार तुरे याचा स्विकार करण्यात येणार नसून मा.यशराज देसाई दादा यांना शुभेच्छा देताना वहया तसेच शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.