मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशानुसार पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक खाजगी जमिन खरेदीसाठी ४ कोटींचा निधीची तरतूद. आमदार शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश,पुनर्वसनाचा प्रश्न लागणार मार्गी.

 

दौलतनगर दि.05:- गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांत भूस्खलन होऊन जिवित व वित्त हानी झाली होती. भूस्खलनामुळे धोकादायक स्थितीतमध्ये असलेल्या आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी,जितकरवाडी (जिंती) या सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता गतवर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या गावांचे कायमस्वरुपी  पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन या बैठकीत  पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे,ढोकावळे,मिरगाव,हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमिन खरेदी करण्याकरीता आवश्यक असलेल्या  कोटी रूपयांच्या निधीची तरतूद  करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

               सदर बैठकीला अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे  यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना ते  पुढे म्हणाले की, गतवर्षी माहे जुलै 2021 मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यात मोठया प्रमाणांत भूस्खलन होऊन जिवीत व वित्त झाली होती. मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये भूस्खलनासह दरडी कोसळण्याचे घटना घडल्याने या धोकादायक गावांचे तात्पुरते स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले होते. या धोकादायक गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने सदर गावांचा कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा जागा मागणी व घर बांधणीचा प्रस्ताव शासनस्तरावर आज अखेर प्रलंबित होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या प्रलंबित असलेल्या प्रस्तावासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमध्ये भूस्खलन होऊन बाधित झालेल्या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने उच्चस्तरीय  बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या गावांचे पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जमिन खरेदी प्रस्तावास लागणारा 04 कोटीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ देण्याचे निर्देश दिले. तसेच एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त श्रीनिवासन यांना  सदर गावांतील कुटुंबांचे नविन घरांचे बांधकामाला गती देण्यात यावी. जेणे करुन या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल व यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व समन्वय यंत्रणांनी गतीने काम करावे असे निर्देशनही मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले.आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले.

चौकट :- संवेदनशिल मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी एकाच बैठकीमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न लावला मार्गी.

गेल्या एक वर्षापासून पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांचा कायमस्वरुपी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता.या प्रलंबित असलेल्या प्रश्नासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे केलेल्या विनंतीवरुन त्यांनी केवळ एकाच बैठकीमध्ये पाटण तालुक्यातील बाधित गावांचे पुनर्वसनाकरीता आवश्यक असलेल्या जमिन खरेदी प्रस्तावाला आवश्यक निधी उपलब्ध करुन देत या बाधित गावांतील कुटुंबांसाठी घरांची उभारणी करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी गतीने काम करण्याचे सर्व यंत्रनांना निर्देश दिले.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे  विनंतीवरुन केवळ एकाच बैठकीमध्ये भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनाच प्रश्न मार्गी लागला.

Comments