राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी तातडीने जमिन हस्तांतरण करण्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे निर्देश. आमदार शंभूराज देसाई यांची माहिती.
दौलतनगर दि.05:-:पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणा-या आपत्तींचा
मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाची आवश्यकता लक्षात घेऊन कोयनानगर,ता.पाटण येथे राज्य राखीव
आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी गतवर्षापासून
राज्यासनाकडे माझा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण
केंद्राचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावासंदर्भात उच्चस्तीय बैठक आयोजित करुन निर्णय
घेण्यासंदर्भात विनंती केलेली होती. यासंदर्भात आज मंत्रालय मुंबई या ठिकाणी
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पाटण
तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण
केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी
दिली.
पाटण तालुक्यातील प्रस्तावित
राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जमिन
हस्तांतरणा संदर्भात आयोजित बैठकीला अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.नितीन करीर, मदत व
पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, प्रधानसचिव (वने) वेणूगोपाल
रेड्डी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ,वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, राज्य
राखीव पोलीस दलाचे महासंचालक चिरंजीव प्रसाद, उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे,
साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल,पाटणचे
उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांचेसह
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले
की, पश्चिम महाराष्ट्रात प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होऊन विशेषत:
सातारा,सांगली व कोल्हापूर या
जिल्हयामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असते.अशा वेळी या आपत्तीला सामोरे
जाण्यासाठी तात्काळ आपत्ती दल तात्काळ दाखल होण्याची गरज लक्षात घेऊन सन 2021 चे अर्थसंकल्पीय
भाषणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य राखीव
पोलीस विभागामार्फत राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण
केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य राखीव पोलीस विभागामार्फत
राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्कय
असणारी महसूल विभागाची जमिन हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. गोकूळ तर्फ
हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य राखीव पोलीस विभागामार्फत राज्य राखीव
आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्राकरीता आवश्यक असलेल्या जमिन
हस्तांतरण प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी महसूल विभागाकडे सादर केला होता. या
प्रस्तावा संदर्भात तातडीने कार्यवाही होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे यांचेकडे विनंती केल्या नुसार मुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली आज
मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री
ना. एकनाथजी शिंदे यांनी पाटण तालुक्यात कोयनानगर येथे नव्याने राज्य राखीव आपत्ती
प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सादर केलेल्या
प्रस्तावानुसार राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापनकरण्यासाठी
३९ हेक्टर जमीनीची मागणी निश्चित केली आहे.
त्यानुसार ही जागा
पोलीस अधिक्षक,सातारा यांच्याकडे वर्ग करण्याबाबत महसूल विभागाने आवश्यक ती
कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी
बैठकीमध्ये संबधित अधिकाऱ्यांना
दिल्याचे सांगत लवकरच या प्रस्तावाला मंजूर मिळून कोयनानगर येथे राज्य राखीव
आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामांस मिळणार असल्याचे
आमदार शंभूराज देसाई यांनी शेवटी नमूद
केले आहे.
Comments
Post a Comment