दि.12 ऑगस्ट रोजीचे वाढदिनी मा.रविराज देसाई (दादा) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत दौलतनगर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्विकारणार.
दौलतनगर दि.11:-
दि.12 ऑगस्ट 2022 रोजीचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) हे सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत दौलतनगर,ता.पाटण
येथील शिवविजय सभागृहामध्ये उपस्थित राहून पाटण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते
यांचेवतीने शुभेच्छा स्विकारणार असल्याची माहिती वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस
देण्यात आलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दि. 12 ऑगस्ट,2022 रोजीचे वाढदिवसाचे
औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे सकाळी 10 वाजता
दौलतनगर,ता.पाटण येथे आगमन होणार आहे.प्रथम ते दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्यातील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुर्णाकृती पुतळयास
पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. त्यानंतर श्री गणेश मंदिरामध्ये श्री
गणेशाचे दर्शन घेणार आहेत. स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास
पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. स्व.शिवाजीराव देसाईसाहेब यांचे समाधी
स्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. मरळी ता.पाटण येथील ग्रामदवैत
श्री निनाई देवीचे दर्शन घेणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे
पुतळयाचे दर्शन घेऊन ते दौलतनगर,ता.पाटण येथील येथील शिवविजय हॉल येथे दुपारी 11 ते
02 या वेळेत पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून शुभेच्छा
स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगत दुपारी 2 नंतर रविराज देसाई(दादा) हे
कुटूंबायांसमेवत बाहेर गावी जाणार आहेत. वाढदिवसानिमीत्त भेट म्हणून हारतुरे, पुष्पगुच्छ
शाल श्रीपळ हे साहित्य न आणता गरीब गरजू कुटूंबातील
शालेय विध्यार्थांना शालेय सहित्याची मदत होण्याच्या दृष्टीने शालेय साहित्यच भेट म्हणून
आणावे असे आवाहन शेवटी वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत केले आहे
Comments
Post a Comment