लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची दौलतनगर येथे शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.

दौलतनगर दि .28 : दौलतनगर , ता . पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना . शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि .31 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11.00 वा संपन्न होणार आहे . “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर , ता . पाटण या ठिकाणी मंत्री ना . शंभूराज देसाई , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई ( दादा ) व सर्व संचालक मंडळ हे 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहणार आहेत . तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दी पत्रकांत केले आहे .