मा.श्री.रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसा दिवशी परगावी जाणार.
दौलतनगर दि.10:- मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र
मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. 12 ऑगस्ट,2024 रोजीचा वाढदिवस व
वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व वाढदिवस नियोजन
समिती यांच्यावतीने आयोजीत करण्यात
येणारे सर्व कार्यक्रम यावर्षी स्थगित करण्यात आले आहेत. दि.12 ऑगस्ट रोजी मा.रविराज देसाई (दादा) हे परगांवी जाणार
असून कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात अशी माहिती वाढदिवस
संयोजन समिती, मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे
व सचिव दिनकर शेजवळ यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
पत्रकांत म्हंटले
आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा
रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. 12 ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी
वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी
मित्रमंडळ यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10
वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे
त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी वाढदिवस
व वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र
राज्यात आवकाळी व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटूंबीयांना आधार देण्यासाठी
वाढदिवस संयोजन समितीने आर्थिक आधार देण्याचे योजले आहे. त्याकरीता दौलत औद्योगिक
प्रशिक्षण संस्था दौलतनगर,ता. पाटण या ठिकाणी मदत कक्ष उभारला असून या मदत
कक्षामध्ये वाढदिवासाचे औचित्य साधून हितचिंतक, शुभचिंतक यांनी जाहिरात किंवा
शुभेच्छा बॅनर न लावता स्वईच्छने आर्थिक मदत करावी. दौलतनगर ता. पाटण येथील मदत
कक्षात जमा होणारी मदत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला दिली जाणार असल्याने या
नैसर्गिक आपत्ती ओढावलेल्या कुटूंबीयांना संकटातून सावरण्यासाठी या सामाजिक
उपक्रमात सहभागी व्हावे, असे अहवान वाढदिवस संयोजन समिती, मोरणा
शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे व सचिव दिनकर शेजवळ यांच्यावतीने केले
आहे.
मा.रविराज देसाई (दादा) यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दि. 12
ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी सातारा याठिकाणी
पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे
त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. परंतू चालू वर्षीचा हा सत्काराचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात
आला असून या कार्यक्रमाची वेळ, तारीख व ठिकाण नंतर कळविण्यात येईल असे सांगत पुढे म्हंटले
आहे की, मा.रविराज देसाई (दादा) हे दि. 12 ऑगस्ट रोजी कुटुंबियांसमवेत परगावी जाणार
असून ते दौलतनगर,ता.पाटण व सातारा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने मा.रविराज देसाई(दादा)
यांच्यावर प्रेम करणा-या शुभचिंतक, हितचिंतक यांनी मा.रविराज देसाई(दादा) यांना कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन
शुभेच्छा दयाव्यात, असे ही वाढदिवस संयोजन समिती, मोरणा
शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे व सचिव दिनकर शेजवळ यांच्या वतीने शेवटी
प्रसिध्दी पत्रकांत दिले आहे.
Comments
Post a Comment