लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची दौलतनगर येथे शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
दौलतनगर दि.28 : दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची
54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन
शुल्कमंत्री ना.
शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.31 ऑगस्ट,
2024 रोजी सकाळी 11.00 वा संपन्न होणार आहे.
“महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी मंत्री ना. शंभूराज
देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा)
व सर्व संचालक मंडळ हे 54 व्या वार्षिक सर्वसाधारण
सभेकरीता उपस्थित राहणार आहेत. तरी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता
जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग
नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दी पत्रकांत केले आहे.
Comments
Post a Comment