मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. श्रीमती मुक्ताबाई बबनराव माळी.


दौलतनगर दि.05:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील गोर-गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. गोर-गरीब महिलांना महिन्याकाठी आर्थिक हातभार लागण्यासाठी महायुती सरकारने महिलांसाठी ही महत्त्वकांक्षी योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या  पाटण तालुका समितीच्या अध्यक्षापदी पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती मुक्ताबाई बबनराव माळी यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका समिती बैठक घेऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजने पासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. तसेच राज्य शासनाची ही योजना ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ देऊन यशस्वी करुयात असे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या अध्यक्षा श्रीमती मुक्ताबाई बबनराव माळी यांनी केले.

       महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या तालुका अध्यक्षा श्रीमती मुक्ताबाई माळी यांचे अध्यक्षतेखाली  या समितीची बैठक लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती,पाटण या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी तहसिलदार अनंत गुरव,मुख्याधिकारी नगर पंचायत पाटण,गट विकास अधिकारी,सहा.आयुक्त,समाज कल्याण विभाग,बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेसह समिती  सदस्य उपस्थित होते.

            यावेळी बोलताना  श्रीमती मुक्ताबाई माळी पुढे म्हणाल्या की, महायुती  सरकारने  ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सबलता येण्यासाठी  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेचे अर्ज भरण्याचे काम सध्या तालुक्यामध्ये प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. महिलांनी देखील आपला अर्ज भरत असताना सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अर्ज भरण्यासाठी  येणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अचूक माहिती देऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे आवाहन करत पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून या दुर्गम भागातील गावांमध्ये इंटरनेट सुविधा कमी अधिक प्रमाणांत असल्याने या योजनेचे अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशा गावांमध्ये योजनेचे अर्ज भरुन घेण्याची खबरदारी प्रशासनाने घेऊन गावातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. महायुतीच्या सरकार कडून रक्षाबंधन दिवशी महिलांना खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करत महिला भगिनींना महायुती सरकारकडून अनोखी भेट देण्यात येणार असल्याने संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी या योजनेसाठी सर्वेक्षण करत संपूर्ण मतदारसंघात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणारी एकही महिला या योजने पासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रकारची आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी आणि अर्ज भरुन घेण्यासाठी  प्रशासनाने आवश्यक ती  खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी शेवटी केल्या.

  चौकट:पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली श्रीमती मुक्ताबाई माळी यांना पुन्हा संधी.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी श्रीमती मुक्ताबाई माळी यांना पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर त्यांनी व कै.बबनराव माळी यांनी  जबाबदारी  स्विकारात चांगले काम केले होते. कै.बबनराव माळी यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाने नुकतेच सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या तालुका अध्यक्षपदी श्रीमती मुक्ताबाई माळी यांची निवड करुन पून्हा एकदा संधी देत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.