Posts

Showing posts from June, 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.

Image
            लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखन्यामार्फत राबवत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्हीएसआय पुणे येथे कारखान्याचे 22 प्रगतशील शेतकरी   यांना ऊस लागणी पासून काढणी पर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती   होण्यासाठी दि.30जून ते 03 जुलै पर्यंत चार दिवसीय प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक पद्धतीने ऊस उत्पादन घेवून एकरी टनेज वाढविले पाहिजे या संकल्पनेच्या विचारातून महाराष्ट्र राज्याचे   पर्यटन मंत्री   तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा) यांच्या मार्गदर्शनातून सदर प्रशिक्षण कार्यक्रमात कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी हे सहभागी झाले आहेत.              सदर प्रशिक्षणास प्रेरित होऊन आणि ऊस उत्पादक शेतक-यांना प्रेरणा देण्यासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. पांडूरं...