लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची दौलतनगर येथे शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा.

 

   दौलतनगर दि.14 :दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री  ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वा संपन्न होणार आहे. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी  मंत्री  ना. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ हे 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहणार आहेत. तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी प्रसिध्दी पत्रकांत दिली आहे. 

Comments

Popular posts from this blog

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.