लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारीसाखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदारांना करार पत्राचे वितरण.
दौलतनगर दि.24: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याचे सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडित प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने कमी कालावधीत कारखाना कार्यक्षेत्रामधील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केले.दरम्यान सन 2026-27 चा येणारा गळीत हंगाम सुरु करण्याच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात येऊन कारखान्याचे ऊस वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील,शिवाजीराव देसाई ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,व्हा.चेअरमन यादवराव तिकुडवे,संचालक शंकर पाटील, सुभाष गव्हाणे, संजय पवार,मयुर जाधव,कार्यकारी संचालक सुहास देसाई,श...