मा. यशराज देसाई लिखित ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर साहेब, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

                         

मुंबई : महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. शंभूराज देसाई साहेबांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांनी लिहिलेल्यालिव्हिंग ग्रेटर लाइफया इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी, १७ मार्च २०२३ रोजी विधानभवनातील समिती कक्षात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर साहेब, मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीतलिव्हिंग ग्रेटर लाइफचे प्रकाशन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगातील मानवी जीवनातील आव्हांनाकडे तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून पाहात सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या या पुस्तकाबद्दल मा. यशराजदादा देसाई यांचे सर्व मान्यवरांनी यावेळी अभिनंदन केले.

     स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून मा. यशराजदादा देसाई यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्यातील अभ्यासू विचारशील नेतृत्वाची ओळख पाटण तालुक्यास झाली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी लिहिलेलेलिव्हिंग ग्रेटर लाइफहे पुस्तक माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय करून देणारे आहे. शुक्रवारी विधानभवनातील समिती कक्षात या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. यशराजदादा देसाई यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील आपली भूमिका मांडली. मोबाइल, त्यावरील समाजमाध्यमे, त्यावरून लिखित तसेच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात होणारा माहितीचा प्रचंड मारा यांनी एक आभासी जग तयार झाले आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे आभासी जग आणि वास्तव जग असे दुहेरी जीवन जगताना दिसते. यात माणसाच्या खऱ्या भावभावना, त्याचे श्रेयस, त्याच्या इच्छा-आकांक्षा, मानवी नाती या साऱ्यांपुढे डिजिटल आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना, आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे तात्त्विक चिंतन 'लिव्हिंग ग्रेटर लाइफ' या पुस्तकात मांडले आहे. आजच्या मानवी जगण्यातील या महत्त्वाच्या विषयाला तरुण वयातच हात घालत त्याचा तात्त्विक अंगाने विचार करून युवा पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी मा. यशराजदादा देसाई यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच हे पुस्तक अमेझॉन, किंडल आणि पुस्तकाची प्रकाशनसंस्था असलेल्या एपीके प्रकाशनाच्या संकेतस्थळावर, तसेच क्रॉसवर्ड स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

     याप्रसंगी महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री मा. जयंतजी पाटील साहेब, राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री मा. संजयजी राठोड साहेब, शिवसेना पक्ष प्रतोद मा. भरतशेठ गोगावले साहेब, आमदार मा. अनिलजी बाबर साहेब, मा. बालाजी कल्याणकार साहेब, मा. महेंद्र दळवी साहेब, मा. भिमराव तापकीर साहेब यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तसेच मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि एपीके प्रकाशनचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

 


Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.