मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदेसाहेबांकडे धनादेश सुपूर्द केला.

 


मुंबई (बुधवार, दि. ०६ सप्टेंबर २०२३) : महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचे बंधू आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत संस्थेतील पदाधिकारी-कर्मचाऱ्यांनी उभी केली. या रकमेचा धनादेश बुधवारी मा. ना. शंभूराज देसाई साहेब व मा. रविराजदादा देसाई यांच्या हस्ते मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांकडे सुपूर्द करण्यात आला.  


मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई यांचा अलीकडेच वाढदिवस संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्सवी प्रथांना दूर सारून यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत उभी करण्याचे ठरवले. त्यातून रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथील, तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून संस्थेने ५१ हजार रुपये निधी उभा केला. बुधवारी मा. ना. शंभूराज देसाई साहेब व मा. रविराजदादा देसाई यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांकडे सुपूर्द केला. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेने दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवलेल्या या विधायक उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी संस्थेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी मंत्री मा. दादाजी भुसे, मा. अतुलजी सावे, मा. अब्दुलजी सत्तार यांच्यासह अन्य आमदार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी. प्रमाणे 100 टक्के ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय विभागांचा घेतला आढावा.