लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.
लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखन्यामार्फत राबवत असलेल्या ऊस विकास योजने अंतर्गत
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्हीएसआय पुणे येथे कारखान्याचे 22 प्रगतशील शेतकरी यांना ऊस लागणी पासून काढणी पर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान
माहिती होण्यासाठी दि.30जून ते 03 जुलै पर्यंत
चार दिवसीय प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक
पद्धतीने ऊस उत्पादन घेवून एकरी टनेज वाढविले पाहिजे या संकल्पनेच्या विचारातून महाराष्ट्र
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज
देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई
(दादा) यांच्या मार्गदर्शनातून सदर प्रशिक्षण कार्यक्रमात कारखाना कार्यक्षेत्रातील
प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी हे सहभागी झाले आहेत.
सदर प्रशिक्षणास प्रेरित होऊन आणि ऊस उत्पादक
शेतक-यांना प्रेरणा देण्यासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री. पांडूरंग नलवडे यांनी
प्रत्यक्ष सहभाग नोंदवून प्रशिक्षणासाठी गेले आहेत.या कार्यक्रमास करखान्याचे जेष्ठ संचालक श्री. अशोकराव
पाटील यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना झाले. सदर कार्यक्रमास
करखान्याचे व्हा.चेअरमन पांडरंग नलवडे,कार्यकारी संचालक सुहास देसाई, शेती अधिकारी
वैभव नलवडे, ऊस विकास अधिकारी प्रविण भाट यांचेसह प्रशिक्षणार्थी शेतकरी व करखान्याचे
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना व्हीएसआय पुणे
येथे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हा प्रत्येक वर्षी राबविण्यात येणार असून इच्छुक ऊस
उत्पादक शेतक-यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकां
करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment