चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.
दौलतनगर दि .06:- महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा दि. 10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवस प्रतिवर्षी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चेअरमन मा.यशराज देसाई( दादा ) यांचा शुक्रवार दि. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नुकतेच मराठवाडया सह सातारा जिल्ह्या मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे मोठे थैमान घातल्याने या विभागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन येथील सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे.या विभागातील अनेक क...