बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

 



सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस प्रमुख तुषार दोषी यांची सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली झाली मात्र बदली झालेच्या दिवशीच संबंधित पोलिस प्रमुखांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्या.या नियमबाह्य बदल्याबाबत सातारा जिल्हा शिवसेना राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन देऊन राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल दाखल केली  आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की,  सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपासून सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून यासंदर्भात राज्याच्या विधिमंडळात ही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत.एवढेच नव्हे तर या घटनेचे संपूर्ण  राज्यसहित देशात चर्चा झाली.त्यामुळे राज्य सरकारने तुषार दोषी यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर ही पाठविले होते.

  अशा या वादग्रस्त पोलीस अधीक्षकांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन  संबंधित अधीक्षकांची सातारा येथून सांगली जिल्ह्यात तडकाफडकी बदली केली.मात्र या अधीक्षकांनी स्वतःची बदली झाली असताना आपल्या अधिकाराचा वापर करून सातारा जिल्ह्यातील सहा ते सात पोलिस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या करण्याचे ही धाडस केल्याचे निदर्शनास आले आहे.वास्तविक ज्या दिवशी स्वतःची बदली झाली आहे त्याच दिवशी स्वतःच्या अधिकारात अधीक्षकांना आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतो मात्र या तुषार दोषी सारख्या महाशयांनी आपल्या बदली दिवशी जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

   

   यासंदर्भात सातारा जिल्हा शिवसेना राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली असून राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांच्याकडे ही निवेदन देऊन मंत्री देसाई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्याकडे हा गंभीर विषय मांडून याची चौकशी करावी अशी आग्रही मागणी केली असल्याची माहिती सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख

जयवंतराव शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.