जनतेने नाकारलेल्यांनी आमच्या नेत्यांना सल्ला देवू नये - उपसभापती विजय पवार.

 

दौलतनगर दि.23:- आमचे नेते पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. जनता दरबारच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रशासनातील अधिकारी यांना सुचना करत असल्याने जनेतेचे प्रश्न मार्गी लागतात.त्यामुळे ते कधीही प्रशासनावर दबाव टाकण्याचा विषय येत नाही. हे समजण्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असावी लागते,सत्यजित पाटणकर आपण केवळ निवडणूकी पुरते जनतेच्या दारात गेल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या निकालाने नियतीचा फेरा कुणाचा उलटा फिरला आहे हे मतदारसंघातील जनतेने दाखवला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा आणि नैतिक अधिकार याविषयी फुकाच्या गप्पा आपण तरी मारु नये.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा आमचे नेते सक्षमपणे चालवत असून आम्हाला त्यांचा निश्चित अभिमान आहे.त्यामुळे आमचे नेते पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा राजीनामा मागण्या अगोदर जनतेने नाकारलेल्या  सत्यजित पाटणकर यांनी आमच्या नेत्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करु नये.असा टोला लोकनेते बाळासाहेब देसाई भवन, पंचायत समिती पाटणचे  उपसभापती विजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकातून  लगावला.

      प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,नुकत्याच दोन दिवसापूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा पक्षाने लोकशाहीचा खून करत ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली त्याबद्दल आता त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत त्या पदाधिकाऱ्यांवर पक्षविरोधी कारवाई करण्याची वेळ तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्षांवर आली ही वस्तुस्थिती पहिल्यांदा  पक्षात नवख्या असणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी समजून घ्यावी. लगेच उतावीळ होऊन बाष्कळपणे काही बोलून प्रसिद्धीत येण्याचा त्यांचा हा खाटाटोप जुनाच आहे सत्यजित पाटणकर आपण काही महिन्यापूर्वी त्या पक्षात गेला आहात. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा प्रत्येकी एक जागा निवडून आल्या. परंतु दुसरीकडे तुमचा बालेकिल्ला काठावर आला हे तुमचे नेतृत्व आहे. संपूर्ण मतदारसंघात तुमचा सुपडा साफ झालाय. त्या अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुमचा दारुण पराभव झाला केवळ निवडणुकीपुरते जनतेच्या दारात जाणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील अशा निष्क्रिय नेतृत्वाला वर्ष दीड वर्षाच्या कालावित सामान्य जनतेने दोन निवडणुकांमध्ये घरी बसवलेले आहे. ते आता आमच्या नेत्यांना सल्ला देऊ लागले आहे त्यांनी अगोदर स्वतःची राजकीय उंची तपासावी मगच अशा प्रकारची बालीश वक्तव्य करावी असे सांगत विजय पवार यांनी पुढे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाने पाटण येथे सुरू असलेल्या कॉलेजचा उल्लेख तुम्ही कसा करत आला हे जगजाहीर आहे त्यामुळे लोकनेते साहेबांचा वारसा आणि स्वाभिमान तुम्हाला किती समजला ते कळते. त्यामुळे या प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचा तुमचा प्रयत्न सुरू असून बालीस वक्तव्य करून पक्ष नेतृत्वाचे लक्षवेधणे हा खटाटोप असल्याची येथील जनता ओळखून आहे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी वक्तव्य करण्याअगोदर सत्यजित पाटणकर यांनी आपली राजकीय उंची अगोदर तपासावी मगच वक्तव्य करावीत. पाटण तालुक्याच्या विकासासाठी देसाई घराण्याच्या तीन पिढ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत .विकास कामांचा झपाटा आणि येथील जनतेच्या सुखदुःखाची असलेली नाळ जोडलेली आहे.ज्यांना तालुक्यात कोणतीच राजकीय उंची नाही अशा नेत्यांनी आमच्या नेत्यांवर बोलण्याआधी आपली राजकीय उंची मोजावी आणि मग वल्गना करावी. आमचे नेते शंभूराज देसाई हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा स्वाभिमानी वारसा असल्यामुळेच तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा असणारा विश्वास आणि पाटण तालुक्यातील जनतेचा भक्कम आधार यामुळे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे दुसऱ्यांदा पालकमंत्री झाले आहेत हे आपण विसरू नये या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ते सक्षम असून सत्यजित पाटणकर यांच्या सल्ल्याची गरज नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेस पक्षाशी गद्दारी कुणी केली हे पण सत्यजित पाटणकर यांनी पहावे.त्यामुळे सत्यजित पाटणकरांनी यापुढे केवळ स्टंटबाजी म्हणून पत्रक बाजी करू नये असे शेवटी उपसभापती विजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

चौकट:-नैतिकतेची भाषा सत्यजित पाटणकर यांना शोभत नाही.

राज्याचे मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून आमचे नेते शंभूराज देसाई यांना शासनाकडून पोलीस संरक्षण पुरविले जाते,याची माहिती जिल्हयातील तुमच्या पक्षातील असणाऱ्या मंत्र्यांकडून सत्यजित पाटणकर यांनी अगोदर घ्यावी.ज्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचा छत्राखाली आसरा घ्यावा लागतो, त्यांनी स्वाभिमानाच्या आणि  वारसाच्या गोष्टी करणे म्हणजे हास्यास्पद आहे. पाटणच्या जनतेने ज्यांना वारंवार नाकारलं, त्यांनी आता उगाच ‘फुटेज’साठी आरोपांचा धुरळा उडवू नये.कारण अजून आपल्याला पक्षांमध्ये रुळायला आणि रुजायला बराच कालावधी आहे .पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठीमागे मतदारसंघातील सर्व सामान्य जनता ठामपणे मागे असून त्यांच्या संरक्षणाची काळजी सत्यजित पाटणकर यांनी करु नये.कारण जनमतदाच्या जोरावर व उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाने सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून आमच्या नेत्यांवर जबाबदारी दिली असल्याने पालकमंत्री पदाबाबत सत्यजित पाटणकर यांनी केलेली नैतिकतेची भाषा तुम्हाला शोभत नसून तुमची राजकीय उंची काय आहे हे संपूर्ण पाटण तालुका जाणून आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.