लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारीसाखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदारांना करार पत्राचे वितरण.

 


दौलतनगर दि.24: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याचे सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडित प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने कमी कालावधीत कारखाना कार्यक्षेत्रामधील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केले.दरम्यान सन 2026-27 चा येणारा गळीत हंगाम सुरु करण्याच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात येऊन कारखान्याचे ऊस वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण  कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील,शिवाजीराव देसाई ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,व्हा.चेअरमन यादवराव तिकुडवे,संचालक शंकर पाटील, सुभाष गव्हाणे, संजय पवार,मयुर जाधव,कार्यकारी संचालक सुहास देसाई,शेती अधिकारी वैभव नलवडे व ऊस विकास अधिकारी प्रविण भाट यांचेसह अधिकारी कर्मचारी तसेच तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन,तोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

             यावेळी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे पुढे म्हणाले की,कारखान्याचा सन 2026-27 चा गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. आपले कारखान्यात यापुढील काळात तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत ना.शंभूराज देसाई व चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये सभासद,शेतकरी हिताचे धोरण राबवित ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून त्यांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. गत गळीत हंगाम कमी कालावधीमध्ये चांगल्या पध्दतीने पार पडला.येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन नियोजन करत असून त्याचाच एक भाग म्हणून कारखान्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या ऊसाची नोंदणी करण्याकरीता कारखान्याचे संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा व आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखन्यास गळीतास देऊन कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी सहकार्य करावे तसेच कारखान्या मार्फत शेतकऱ्यांना उधारीवरती युरीया,10.26.26,15.15.15 त्याचबरोबर व्ही.एस.आय.चे एन.पी.के.,मायक्रो न्यूट्रंट व वसंत ऊर्जा ही फवारणीची खते उसविकास विभागामार्फत देण्यात येत असून याचाही लाभ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.