ऊस गळीत हंगाम सन२०२४/२५ साठी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ

                            

नवारस्ता/प्रतिनिधी

 गुढीपाडव्या च्या शुभ मुहूर्तावर पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 

सन २०२४/२५ या वर्षासाठी ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ  गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  करण्यात आला.


  राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे चेअरमन मा.श्री. यशराज देसाई यांच्या प्रयत्नातून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर  कारखान्याने आपली प्रगती कायम राखण्यात यश मिळवले आहे.

     

आजपर्यंत कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक करार हे साधारण मे महिन्यात केले जातात मात्र देसाई कारखान्याने या कराराचा शुभारंभ गुढी पाडव्याच्या  मुहूर्तावर करून एक पाऊल पुढे टाकले आहे.

    यावेळी पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक  शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा  जास्तीत जास्त वापर करून ऊस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे तसेच  शेतक-यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता घालावा असे आवाहन देसाई कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे यांनी  केले.


   यावेळी कारखान्याचे  व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे,शिवाजीराव देसाई ऊस तोडणी  वाहतूक संस्थाचे चेअरमन राजाराम जाधव,शेती अधिकारी वैभव नलवडे, संस्थेचे सचिव नवनाथ साळुंखे,केन यार्ड  सुपरवायझर श्री. मानसिंग मोरे तसेच ऊस तोड वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी व्हीएसआय पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना.