यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची आदर्श कामगिरी शेतकऱ्यांना ३ हजार एवढा उच्च दर देत पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी लोकनेत्यांचा वारसा जपणारे कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून यशराज देसाईंचे सहकार व कृषी क्षेत्रातून कौतुक

 

सातारा (१५ एप्रिल २०२६) : पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगात स्पर्धा तीव्र असताना, मर्यादित उत्पादन क्षमता असूनही शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देत पाटण तालुक्यातील मरळी-दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सरस कामगिरी केली असून शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी ऊस दर वर्ग करणारा सातारा जिल्ह्यातील हा दुसरा कारखाना ठरला आहे.  


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन असतानाही, पहिल्याच उचलीत ३ हजार रुपयांची रक्कम देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एफआरपी देण्यासाठी कोणतेही कर्ज न उभारता १०० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे केवळ १,९५,००० मेट्रिक टन गाळप झाले होते. तरीही पूर्ण एफआरपी वेळेत जमा करण्यात आली. डोंगराळ, दुर्गम भागातील कमी गाळप क्षमतेचा कारखाना असूनही इतर मोठ्या कारखान्यांप्रमाणे स्पर्धात्मक दर देण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना यशस्वी ठरला आहे. या यशामागे चेअरमन यशराज देसाई यांची अभ्यासू दृष्टी, कार्यक्षम व्यवस्थापन आणि त्यांच्यातील संवेदनशील नेतृत्व असल्याची भावना शेतकरी, संचालक मंडळ आणि सहकार क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. 


संवेदनशील नेतृत्व आणि कार्यक्षम व्यवस्थापन 


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अल्पावधीतच कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणावर भर दिला. १२५० मेट्रिक टन एवढी मर्यादित क्षमता असलेल्या या कारखान्याची २५०० मेट्रिक टनापर्यंत क्षमता वाढवली. तसेच पुढे ती गाळप क्षमता अतिरिक्त ३००० मेट्रिक टनापर्यंत वाढवता येईल असे त्यांनी नियोजन केले. तसेच कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवून आर्थिक शिस्त, काटेकोर नियोजन आणि प्रभावी समन्वय यांवर भर दिला. त्यामुळे मर्यादित संसाधनांमध्येही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत, पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हता जपणारा कारखाना म्हणून ख्याती प्राप्त करत यशराज देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगात लक्षवेधक कामगिरी केली आहे. 


सहकाराला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत संवेदनशीलतेने नेतृत्व केल्यास लोकहितकारी कार्य करता येते, हे युवा नेते यशराज देसाई यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील सहकार व कृषी क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र, या यशाचे संपूर्ण श्रेय ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कामगार वर्ग आणि संचालक मंडळ यांना असल्याचेही चेअरमन यशराज देसाई यांनी प्रांजळपणे नमूद केले. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शन सदैव महत्त्वपूर्ण ठरत असून लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा वारसा जपत कारखान्याची वाटचाल आदर्शवत ठेवण्यास सदैव कटिबद्ध असल्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून एफ.आर.पी.प्रमाणे 100 टक्के उसबिल बँक खाती वर्ग. व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांची माहिती.

बदली झालेल्या पोलीस अधीक्षकांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या..सातारा जिल्हा शिवसेनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा शुक्रवार दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त हार,तुरे न आणता शोलय वस्तू भेट स्वरुपात देण्याचे आवाहन.