लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 43 व्या पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.
दौलतनगर दि.13:- महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्रीग्रंथराज
ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन सोमवार दि.२० एप्रिल ते गुरुवार
दि.
२३ एप्रिल,२०२6 पर्यंत कारखाना कार्यस्थळ
दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी
संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
लोकनेते बाळासाहेब
देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन
दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात
येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२6 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 43 व्या पुण्यतिथी
सोहळयाच्या निमित्ताने दि. २० ते २३ एप्रिल,२०२6 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक
पारायण सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी
स्मारकामध्ये करण्यात आले आहे. सोमवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी
ग्रंथाचे पूजन पाटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.जयवंतराव शेलार यांच्या
शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा
सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.
या पारायण सोहळयात
ह.भ.प. पुंडलीक महाराज कापसे आळंदीकर हे व्यासपीठ चालक असून सोमवार दि. २० एप्रिल २०२6 रोजी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज निमसोड यांचे प्रवचन, गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे,अध्यक्ष स्वानंद सुखनिवास सद्गुरु जोग महाराज वारकरी
शिक्षण संस्था आळंदी यांचे किर्तन, मंगळवार दि. २१ एप्रिल, २०२6 रोजी ह.भ.प. मदन महाराज कदम,उपाध्यक्ष महाराष्ट्र वारकरी
महामंडळ युवा शाखा महाराष्ट्र राज्य यांचे प्रवचन तर प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी
महाराज (जोशी बाबा) यांचे किर्तन आणि बुधवार दि.२२ एप्रिल, २०२6 रोजी ह.भ.प श्रीपाद महाराज
साखराळे,सातारा यांचे प्रवचन तर प्रा.डॉ.गजानन
महाराज वाव्हळ गुरुजी,पुणे यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या 43 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि. २३ एप्रिल २०२6 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.श्रीमती विजयादेवी देसाई (मॉसाहेब), मा. नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा), मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर
पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १०
ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. अक्षय महाराज भोसले अध्यक्ष वारकरी युवा मंच
महाराष्ट्र राज्य यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उद्योग समुह,दौलतनगर
यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता
करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री
तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून
सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे सतरावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या
निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी
वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय
कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर,
पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 43 व्या
पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण
सोहळयाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात
आले आहे.

Comments
Post a Comment